Share Market: दिवसभरातील अस्थिरतेनंतर शेअर बाजारमधील निर्देशांक Sensex आणि Nifty मध्ये काहीशी घसरण झाल्याचं दिसून आलं. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 59.04 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 28.30 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.10 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,832.97 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.16 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,276 वर पोहोचला आहे. 


आज 1129 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2141 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 112 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना बँक आणि रिअॅलिटी क्षेत्रं सोडली तर सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही घसरण झाली आहे. 


शुक्रवारी शेअर बाजारात ONGC, Divis Labs, UltraTech Cement, Cipla आणि Shree Cements या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून   Coal India, SBI Life Insurance, HDFC, Bajaj Auto and Larsen आणि Toubro या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • Coal India- 2.61 टक्के

  • SBI Life Insurance- 2.14 टक्के

  • HDFC- 1.22 टक्के

  • Bajaj Auto- 0.97 टक्के

  • Larsen- 0.77 टक्के


या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • ONGC- 2.24 टक्के

  • Cipla- 2.06 टक्के

  • Divis Labs- 2.0 टक्के

  • UltraTechCement- 1.84 टक्के

  • Shree Cements- 1.51


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha