Skin Care Tips : आपण आपल्या शारीरिक आरोग्याची जितकी काळजी घेतली पाहिजे तितकीच आपल्या त्वचेची देखील काळजी घेतली पाहिजे. आपल्या व्यस्त जीवनात आपण आपल्या त्वचेची योग्य काळजी घेऊ शकत नाही, त्यामुळे पिंपल्स आणि डागांची समस्या उद्भवते. याबरोबरच चेहरा निस्तेज दिसू लागतो. काही लोक अनेक ब्युटी ट्रीटमेंट घेतात, पण तरीही त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही.
पण, तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही घरी ऑक्सिजन फेशियल करू शकता. गेल्या काही दिवसांपासून फेशियलचा ट्रेंड आहे. ऑक्सिजन फेशियल चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकते. यामध्ये आढळणारे अँटी-एजिंग आणि क्लिन्जर्स त्वचा सुधारण्याचे काम करतात. चला जाणून घेऊयात या ऑक्सिजन फेशियलबद्दल.
आपला चेहरा स्वच्छ करा
घरी ऑक्सिजन फेशियल करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कच्च्या दुधाने तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता. हे करताना चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील सर्व घाण निघून जाईल.
वाफ घेणे
चेहरा पूर्णपणे स्वच्छ झाल्यावर चेहऱ्यावर वाफ घ्या. यासाठी एका भांड्यात पाणी उकळून चेहरा वाफवून घ्या. स्टीम घेतल्याने चेहऱ्याची छिद्रे उघडतात आणि त्वचाही हायड्रेट राहते.
मसाज करणे देखील महत्वाचे
या दोन्ही प्रक्रिया केल्यानंतर मसाज करा. तुम्ही चेहऱ्यावर कोणतीही मसाज क्रीम वापरू शकता. गोलाकार हालचालीत डोळ्यांभोवती मसाज करा. लक्षात ठेवा की मसाज 10 मिनिटांसाठी केला पाहिजे.
फेस पॅक लावा
यानंतर तुम्ही चेहऱ्यावर फेस पॅक लावा. फेसपॅक बनवण्यासाठी पाच चमचे बदाम पावडर, दीड चमचा बेंटोनाइट पावडर, एक चमचा ओटमील, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि गुलाबपाणी मिसळा. या सर्व गोष्टी नीट मिसळा. हा फेस पॅक 14 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहरा उजळतोच पण कोरडेपणाही दूर होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :