Skin Care Tips : प्रत्येक मुलीला आपली त्वचा पिंपल्सरहित आणि तजेलदार असावी असं वाटतं. यासाठी महिला अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने (Beauty Products) वापरतात. सर्वात आधी, चेहऱ्यावर फेस वॉश (Face Wash) लावतात. ज्यामुळे चेहरा स्वच्छ होईल. पण, प्रत्येक वेळी रसायनयुक्त फेस वॉश वापरणं गरजेचं नाही. त्यामुळे अनेक वेळा त्वचेच्या समस्या वाढतात. त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी काही घरगुती गोष्टींचा वापर करणे गरजेचे आहे. या नैसर्गिक गोष्टींनी तुम्ही तुमचा चेहरा धुवू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा अधिक ग्लो करेल. या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
बेसनाचे पीठ
बेसनाच्या डाळीपासून बनवलेले बेसन चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. पूर्वी लोक चेहरा तजेलदार करण्यासाठी चेहऱ्यावर बेसनाचे पीठ लावायचे. हा बेसनाचा फेस पॅक तयार करण्यासाठी बेसनामध्ये गुलाब पाणी आणि दही मिसळून त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि साधारण 4-5 मिनिटांनी चेहरा हलक्या हाताने धुवून घ्या. तुमच्या चेहऱ्यावर काही दिवसांतच नैसर्गिक ग्लो येईल.
मध
मधाच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट होते आणि चेहऱ्यावरची चमक कायम राहते. याशिवाय त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आढळतात, जे त्वचेला आरामदायी प्रभाव देतात. यासाठी सर्वात आधी चेहरा हलका ओला करा. यात थोडे मध घेऊन चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने चोळा आणि थोड्या वेळाने चेहरा धुवा.
टोमॅटोचा रस
टोमॅटोमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. टोमॅटोच्या रसाने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि चेहऱ्यावरचे डागही दूर होतात. टोमॅटोचा रस लावण्यासाठी त्याचा रस काढा आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. यानंतर, 5-7 मिनिटे चेहरा तसाच ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे चेहरा तजेलदार दिसेल.
जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणायची असेल तर तुम्ही रसायनयुक्त प्रोडक्टचा वापर करण्या व्यतिरिक्त जर या गोष्टींचा चेहऱ्यासाठी वापर केला तर तुम्हाला काही दिवसांतच त्याचा फरक दिसून येईल. तसेच, चेहऱ्यावरचे डागही दूर होतील.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.