Skin Care Tips : सुंदर, स्वच्छ आणि फ्रेश दिसण्यासाठी दिवसातून आपण चेहरा तर नक्कीच स्वच्छ करतो. यासाठी फेसवॉश वापरतो. पण, फेसवॉशने चेहरा (Skin Care Tips) धुतल्याने त्वचेवर नेमका काय परिणाम होतो. तसेच, दिवसातून किती वेळा चेहरा स्वच्छ धुणं गरजेचं आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. काही लोक दिवसातून 4-5 वेळा चेहरा धुतात. जर तुम्ही तुमचा चेहरा इतक्या वेळा धुत असाल तर तुम्हाला लवकरच त्वचेची समस्या येऊ शकते. यासाठी आपल्या स्किन टोननुसार आपण फेसवॉशचा वापर केला पाहिजे असं त्वचा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे फेसवॉश मिळतील, त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आहेत ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात.


फेसवॉशमुळे तुमच्या चेहऱ्याची स्वच्छता राखण्यास मदत होते. याबरोबरच यामुळे मृत पेशी, घाण आणि धूळ देखील दूर होते. काही लोक मेकअप काढण्यासाठी फेस वॉशचा वापर करतात. जास्त फेसवॉश वापरल्याने त्वचा लवकर खराब होते. त्यामुळे त्वचेचा मुलायमपणा टिकवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावर घाण जमा होण्यापासून बचाव होईल. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ केल्याने मुरुम आणि डाग यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.


स्किन टोननुसार फेसवॉश कसा निवडायचा?


1. कोरडी त्वचा


जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर मॉइश्चरायझरयुक्त फेसवॉश लावा. याशिवाय फेस वॉश खरेदी करताना त्यातील घटकांकडे लक्ष द्या. कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी फेसवॉशमध्ये पेट्रोलियम जेली, लॅनोलिन, खनिज तेल, कोकोआ बटर, ग्लिसरीन, शिया बटर असणे आवश्यक आहे. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी चेहऱ्यावर साबण वापरू नये, यामुळे तुमच्या त्वचेवर जळजळ होऊ शकते.


2. तेलकट त्वचा


तेलकट त्वचा असणाऱ्यांना अनेकदा चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असते. या लोकांनी फोम बेस्ड फेस वॉश वापरावा. तेलकट त्वचा असणाऱ्यांनीही वेळोवेळी चेहरा एक्सफोलिएट करत राहावे. यासाठी सॅलिसिलिक ॲसिड, ग्लायकोलिक ॲसिड आणि लैक्टिक ॲसिड असलेल्या गोष्टींचा वापर करावा. या सर्वांशिवाय तुम्ही एलोवेरा जेल, टी ट्री ऑईल आणि ग्रेप सीड ऑईल देखील वापरू शकता. हे घटक तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल संतुलित करण्यास मदत करतील. 


3. कॉम्बिनेशन स्किन 


जर तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल, तर तुम्ही असा फेसवॉश वापरावा ज्यामुळे तुमची त्वचा जास्त कोरडी होणार नाही किंवा जास्त मॉइश्चराईज राहणार नाही. खूप कोरडी त्वचा असल्यामुळे, चेहरा पांढरा दिसू शकतो आणि खूप मॉइश्चरायझेशनमुळे, चेहरा चिकट दिसू शकतो. कॉम्बिनेशन स्किन असलेल्या लोकांच्या चेहऱ्याचा टी झोन ​​भाग अनेकदा तेलकट दिसतो.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Coconut Water : उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी नारळ पाण्याचं सेवन करावं की करू नये? वाचा तज्ज्ञांचा सल्ला