Skin Care Tips For Winter : आपली त्वचा तरूण ठेवण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते, पण त्यासाठी त्वचेची विशेष काळजी घेणेही गरजेचे असते. विशेषतः हिवाळ्यात. कारण या दिवसात थंड वाऱ्यामुळे आपली त्वचा खूप कोरडी आणि निर्जीव होते. कारण या ऋतूत आपल्या त्वचेतील आर्द्रता निघून जाते, त्यामुळे त्वचेवर सुरकुत्याही सहज पडू लागतात. अशा परिस्थितीत त्वचा मऊ होण्यासाठी आणि तिची चमक कायम ठेवण्यासाठी काही उपाय करण्याची गरज आहे.
येथे काही सोप्या आणि घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या, ज्याचा अवलंब करून आपण हिवाळ्यातही आपली त्वचा निरोगी, मुलायम आणि चमकदार ठेवू शकतो.
केळी : केळीमध्ये पोटॅशियम आणि चांगले फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. या चांगल्या फॅट्सचा वापर आपल्या त्वचेसाठी मॉईश्चरायझर म्हणून होतो आणि त्यामुळे त्वचेवर चमकदारपणा येतो. यासाठी एक केळ घेऊन ते चांगले मॅश करा आणि आता या पेस्टने मानेला आणि चेहऱ्याला मसाज करा. काही वेळाने पाण्याने धुवून टाका. तुम्हाला दिसेल की यामुळे तुमच्या त्वचेवर कोरडेपणा राहणार नाही आणि ती पूर्वीपेक्षा खूपच मऊ आणि तरुण दिसू लागली आहे.
मध : मधाचा वापर त्वचेसाठी औषधापेक्षा कमी नाही. मध त्वचेचे पोषण करण्यासोबतच मृत पेशी काढून टाकण्याचे काम करते. मध योग्य प्रमाणात घेऊन चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटांनी पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा पूर्वीपेक्षा मऊ आणि तरुण दिसू लागेल.
बदाम तेल : बदामाच्या तेलात व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असते. याला मधात मिसळल्याने त्याचे फायदे आणखी वाढतात. यासाठी बदाम तेल आणि मध समान प्रमाणात मिसळा. या पेस्टने मानेवर आणि चेहऱ्यावर मसाज करा, थोड्या वेळाने चेहरा पाण्याने धुवा. अशा प्रकारे तुमची त्वचा पूर्वीपेक्षा अधिक तरूण आणि चमकदार दिसेल.
ऑलिव ऑईल : ऑलिव्ह ऑईलमध्ये केवळ व्हिटॅमिन-ई नाही तर त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत. ज्यामुळे त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. हे तेल दुधासह मिसळून लावणे चांगले असते. या तेलाने चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचा मुलायम आणि चमकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Immunity Booster : हिवाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती, 'या' फळांमधून शरीराला मिळतील सर्व आवश्यक व्हिटामिन्स
- Boris Johnson Controversy : प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्काराच्या पूर्वसंध्येला बोरिस जॉन्सन यांच्या कर्मचार्यांची पार्टी, सरकारने ब्रिटनच्या महाराणीची माफी मागितली
- अभिनेता राजकुमार रावच्या नावाने बनावट मेल, 3 कोटींचा गंडा घालण्याचा कट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha