Skin Care Tips : अनहेल्दी खाण्याच्या (Unhealthy Food) सवयी आणि जीवनशैलीचा (Lifestyle) परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच (Health Tips) नाही तर आपल्या त्वचेवरही (Skin Care Tips) दिसून येतो. पिंपल्स, पिगमेंटेशन, ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स, या सर्व गोष्टी आपल्या त्वचेचं सौंदर्य तर बिघडवतातच पण त्वचेचा पोतही यामुळे खराब होतो. तसेच, चेहरा चांगला दिसावा यासाठी जरी आपण मेकअप करत असलो तरी या दरम्यान मेकअप केल्याने त्वचेचे इतर प्रकारचे नुकसान होते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा चेहरा मुलायम, ग्लोईंग आणि डागमुक्त हवा असेल, तर सर्वात आधी त्वचेचा पोत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.

  


'या' टिप्स फॉलो करून स्किन टोन सुधारा 


एक्सफोलिएशन गरजेचं


त्वचेवर धूळ, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होणे हे टेक्सचर त्वचेचे सर्वात मोठं कारण आहे. ते काढून टाकण्यासाठी, त्वचा नियमितपणे एक्सफोलिएट करणं आवश्यक आहे. यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्वचा एक्सफोलिएट करणं पुरेसं असेल. हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करा. अन्यथा नंतर चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.


त्वचा मॉईश्चराईझ ठेवा


तेलकट त्वचा असलेले लोक मॉइश्चरायझर लावणं टाळतात. मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा अधिक तेलकट होते असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. पण, मॉइश्चरायझर तेलाचे उत्पादन नियंत्रित करते आणि त्वचा कोरडी होण्यापासून देखील रोखण्याचं काम करते. यासाठी दिवसातून दोनदा मॉइश्चरायझर वापरा. 


सनस्क्रीन लावायला विसरू नका 


सनस्क्रीन फक्त टॅनिंगपासून संरक्षण करत नाही तर त्वचेचा पोत देखील सुधारण्यास मदत करते. SPF युक्त सनस्क्रिन वापरल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यापासून बचाव होतो आणि डागही दूर होतात. हिवाळ्यात सनस्क्रीनची गरज नसते असा अनेकांचा गैरसमज आहे. पण, प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे.


तेलाचा वापर करा 


त्वचेचा पोत सुधारण्यासाठी दररोज तेलाने मालिश करा. मग ते खोबरेल तेल असो, बदाम तेल किंवा इतर कोणतेही फेशियल तेल असो. हे सेबम उत्पादन नियंत्रित करते, त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यास उपयुक्त ठरते.  


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Definition of Childhood Cancer: बाल कर्करोगाचे प्रकार माहितयत? याबाबत अनेक चर्चा, गैरसमज दूर करण्यासाठी 'हे' नक्की वाचा