Skin Care Tips : गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार हळूहळू वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. हिवाळा (Winter Season) हा असा ऋतू आहे यामध्ये त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. खरंतर, थंडीत त्वचा कोरडी (Dry Skin) आणि निस्तेज होऊ लागते. अशा परिस्थितीत, हिवाळ्याच्या ऋतूत त्वचेची काळजी (Skin Care Tips) घेणं जास्त गरजेचं आहे. हिवाळ्यात चेहऱ्याचं होणारं नुकसान यापासून बचाव करण्यासाठी लोक हिवाळ्यातही सनस्क्रीन (Sunscreen) वापरतात. सनस्क्रीनचा वापर आपल्या त्वचेसाठी चांगला आहे. त्यामुळे सूर्याच्या धोकादायक अतिनील किरणांपासूनही आपले संरक्षण होते. त्यामुळे हिवाळ्यात सनस्क्रिन वापरणे ही आपली गरज बनते. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 90% लोक हिवाळ्यात सनस्क्रीनची सध्या गरज नाही असे समजून ते लावत नाहीत. तर आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला हिवाळ्यात सनस्क्रिन वापरण्याचे नेमके कोणते फायदे आहेत आणि हिवाळ्यातही सनस्क्रीन वापरणं का गरजेचं आहे? या संदर्भात अधिक माहिती सांगणार आहोत.

  
 
सनस्क्रीन निर्जीव कोरड्या त्वचेपासून संरक्षण करते 


हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. ही कोरडी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, आपल्याला फायदेशीर घटक प्रदान करणे आवश्यक आहे. हे फायदेशीर घटक सनस्क्रीनमध्ये असतात जे त्वचेला मॉइश्चरायझ करतात. त्यामुळे हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी राहात नाही. यासाठी हिवाळ्यात चेहऱ्यावर सनस्क्रिन वापरणं गरजेचं आहे.  
 
अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण प्रदान करते 


सनस्क्रीन आपल्या त्वचेचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करते. थंडीच्या दिवसांत सूर्यापासून मिळणारा सनस्क्रीन आपल्या त्वचेसाठी अतिशय धोकादायक असतो, त्यामुळे थंडीच्या दिवसांत सनस्क्रीन अत्यंत आवश्यक आहे.
 
त्वचेचे नुकसान होण्यापासून बचाव करते 


सनस्क्रीन त्वचेचे केवळ बाह्य किरणांपासूनच नव्हे तर त्वचेच्या आत असलेल्या कृत्रिम नुकसानीपासूनही संरक्षण करते. हे त्वचेवर सुरकुत्या आणतात. त्यामुळे थंडीत दिवसातून किमान दोनदा सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. 


नेहमी सनस्क्रीन लावा


हिवाळ्यात आपण सूर्यप्रकाशाला टाळू शकत नाही. कारण थंडगार थंडीपासून शरीराला ऊबदार ठेवण्यासाठी उन्हाचा थोडा तरी प्रकाश शरीराला हवा असतो. हिवाळ्यात कोरडेपणामुळे त्वचेला सुरकुत्या आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सनस्क्रीन वापरल्याने त्वचेची आर्द्रता स्थिर राहते. यासाठी सनस्क्रिनचा वापर करावा. 


हिवाळ्यात बहुतेकांची त्वचा कोरडी होती. आणि कोरड्या त्वचेमुळे चेहऱ्यावर रॅशेस येणं, सुरकुत्या येणं, स्किनची जळजळ होणं या गोष्टी स्वाभाविक आहेत. यासाठीच तुम्ही सनस्क्रिन वापरणं गरजेचं आहे. जर तुमची त्वचा अतिशय सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही कोणतंही सनस्क्रिन वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : लहान वयातच मुलाचे केस पांढरे होतायत? ही समस्या दूर करण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा