Skin Care Tips : आजच्या काळात व्यस्त जीवनशैलीमुळे (Lifestyle) शरीराबरोबरच चेहऱ्याची काळजी घेणंही होत नाही. यामुळे आपल्या चेहऱ्यावर सतत थकवा आणि मानसिक ताण जाणवतो. अनेक वेळा चेहऱ्याची त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. अशा परिस्थितीत चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी एक रामबाण उपाय तुम्ही करून पाहू शकता. यामध्ये तुम्हाला दूध आणि मधाच्या साहाय्याने एक फेस पॅक तयार करायचा आहे. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर तुमची स्किन काही तासांतच ग्लो करायला लागेल. तसेच, तुमची त्वचाही निरोगी राहील. हा फेस पॅक कसा तयार करायचा ते जाणून घ्या.
दुधामध्ये असणारे हायड्रेटिंग गुणधर्म त्वचेला मऊ, मुलायम करतात, तर मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो. हा चेहऱ्यावरील मुरुम आणि डागांशी लढण्यास मदत करतो.
अशा प्रकारे दूध आणि मधाचा फेस पॅक तयार करा
रात्री झोपण्यापूर्वी त्वचा कोमट पाण्याने धुवा आणि हलक्या हाताने पुसून टाका. एका लहान भांड्यात 1 चमचा कच्चं दूध आणि 1 चमचा मध चांगले मिसळा. आता तयार मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाजप्रमाणे लावा. तुम्ही तुमच्या बोटांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर हा फेस बॅक पसरवू शकता. हे मिश्रण त्वचेवर लावल्यानंतर त्वचेला हलक्या हाताने मसाज करावे लागेल, हे त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर 15-20 मिनिटे थांबा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर, एक चांगला मॉइश्चरायझर लावा जेणेकरून त्वचा ओलसर आणि गुळगुळीत राहील.
जाणून घ्या या फेस पॅकचे फायदे
मॉइश्चरायझ्ड आणि ग्लोइंग स्किन : दूध आणि मध यांचे मिश्रण त्वचेला मॉइश्चरायझ करू शकते आणि तुमच्या त्वचेला ग्लो आणू शकते.
अँटी-एजिंग गुणधर्म : दुधामध्ये जीवनसत्त्वे आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात जे त्वचेचे वृद्धत्व रोखू शकतात.
मुरुमांवर चांगला उपचार : मध आणि दुधाचे मिश्रण त्वचेवरील मुरुमांचे डाग कमी करण्यात मदत करू शकते.
चेहऱ्यावर ग्लो येतो : हा फेस पॅक लावल्याने त्वचेचा चांगला ग्लो येतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :