Skin Care : वय वाढत गेलं की त्याचा परिणाम व्यक्तीच्या आत्मविश्वासावर होत असल्याचं समोर आलंय. कारण वाढत्या वयाचा परिणाम त्वचेवर होतो. स्वत:मधील असे बदल होताना पाहून मनात विविध विचार येऊ लागतात. मात्र, तुमच्या त्वचेची (Skin Care) विशेष काळजी घेऊन, तसेच तुमच्या आहारात बदल करून तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी 25 वर्षांसारखी चमकणारी त्वचा मिळवू शकता. जाणून घ्यायचंय यामागील गुपित, फक्त  'या' 6 टिप्स फॉलो करा.


 


अनेकांना वाढत्या वयातील बदल स्वीकारणे कठीण जाते


वयाच्या 20-25 वर्षी जसे आपण दिसतो, अगदी तसेच रुप 40 व्या वर्षी कायम असणे जे जरी शक्य नसले तरी आपण डाएटच्या माध्यमातून त्वचा सुंदर दिसण्याचा प्रयत्न करू शकतो. जसजसे आपण चाळीशी ओलांडतो तसतसे शरीरात अनेक बदल दिसू लागतात. वयाचा हा टप्पा पार केल्यानंतर त्वचा सैल होऊ लागते आणि चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसू लागतात. अनेकांना हे बदल स्वीकारणे कठीण जाते. त्याच्या आत्मविश्वासालाही तडा जाऊ लागतो. वयाची 40 ओलांडल्यानंतरही, आपण आपली त्वचा 25 वर्षांपर्यंत तरुण ठेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही आरोग्यदायी बदल करावे लागतील.


 


असे पदार्थ लगेच टाळा


साखर आणि परिष्कृत कार्बोहायड्रेट पदार्थ खाणे टाळा. 
या पदार्थांचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. 
मधुमेहामुळे तुमचे शरीर अकाली कमकुवत होऊ लागते. 
अशा परिस्थितीत तरुण वयात तुम्ही वृद्ध दिसू शकता. 
मधुमेहादरम्यान त्वचेतून द्रव बाहेर पडण्याची प्रक्रिया वाढते. 
यामुळे तुमची त्वचा सैल होते.


 


दारू पिणे टाळा


अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे त्वचेच्या वृद्धत्वाची समस्या देखील वाढू शकते. 
जेव्हा तुम्ही अल्कोहोल वापरता तेव्हा डिहायड्रेट होण्याचा धोका वाढतो. 
ही स्थिती तुमच्या त्वचेसाठी चांगली नाही. 
अशा परिस्थितीत जे लोक नियमितपणे अल्कोहोलचे सेवन करतात, त्यांचे वय लवकर होऊ शकते.
फास्ट फूड, तसेच चरबीयुक्त जंक फूडचे सेवन अजिबात करू नका
चरबीयुक्त पदार्थ तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले नसतात. 
तुमच्या आहारात नेहमी अशा पदार्थांचे सेवन करा, ज्यात हेल्दी फॅट आणि फायबर असेल.


 


तुम्हाला कॉफी पिण्याची सवय असेल तर...


वयाच्या 40 व्या वर्षी कॅफीनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्ही डिहायड्रेशनला बळी पडू शकता. त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. तुम्ही अल्पावधीत वृद्ध दिसू शकता. अशा परिस्थितीत कॉफीचे सेवन कमी करा.


 


ताण घेऊ नका


आजकालच्या जीवनात तुम्ही विविध प्रकारचे ताण घेतले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुमच्या तणावाचा तुमच्या त्वचेवरही नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जितके आनंदी व्हाल. तुमच्या चेहऱ्यावर जितकी चमक दिसेल.


 


ताज्या भाज्या खा! आणि मग तुमची त्वचा पाहा...


वयाच्या 40 व्या वर्षी 25 वर्षांसारखी चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी अधिक भाज्या खा, तुमच्या त्वचेला आतून पोषण देण्यासाठी दररोज 3-5 भाज्या खाण्याचे लक्ष्य ठेवा. पोटॅशियम, फायबर, फोलेट, व्हिटॅमिन ए आणि सी इत्यादी बहुतेक भाज्यांमध्ये आढळतात. भाज्या खाणे त्वचेसाठीही फायदेशीर असते.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Dumping Syndrome : एक अशी मुलगी, जिला पोटच नव्हतं! होती उत्कृष्ट शेफ, पोटाशिवाय 12 वर्षे आयुष्य काढले