Side Effects of Peanuts : थंडीच्या दिवसांत हवेतील गारवा आणि गरमागरम भट्टीतील शेंगदाणे खायला कोणाला आवडत नाही. अनेक जण तर नाश्ता किंवा तोंडात टाकण्यासाठी टाईमपास म्हणून शेंगदाण्याकडे पाहतात. कारण शेंगदाण्यात असे अनेक पौष्टिक घटक असतात, जे आरोग्यासाठी उत्कृष्ट मानले जातात. पण तुम्हाला हिवाळ्यात दिवसभर फक्त शेंगदाणे चघळण्याची सवय आहे का, जर तुमचे उत्तर होय असेल, तर तुम्ही ही सवय लगेच सोडली पाहिजे. कारण जर तुम्ही एकाच वेळी गरजेपेक्षा जास्त शेंगदाणे खाल्ले तर तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की, पोटात गोळा येणे, अतिसार आणि बद्धकोष्ठता. याशिवाय शेंगदाणे खाल्ल्याने पक्षाघात, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.
हिवाळ्यात अनेकजण शेंगदाणे चघळतात
सर्वप्रथम तुम्ही दिवसातून फक्त मूठभर शेंगदाणे खावे. शेंगदाणे खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दिवसा आणि संध्याकाळ तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता. जर तुम्ही शेंगदाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर शरीरात अॅलर्जीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि बद्धकोष्ठता, जुलाब आणि सूज येण्याची शक्यता देखील वाढते. अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही मात्र, किमान एक मूठभर शेंगदाण्यामध्ये 170 कॅलरीज असतात, त्यामुळे दिवसभरात शेंगदाणे खा मात्र शेंगदाण्याचे अतिसेवन करू नका.
उच्च रक्तदाब सारखी समस्या असू शकते!
शेंगदाणे खूप स्वस्त आणि हिवाळ्यासाठी चांगले आहेत. पण त्यात फॉस्फरस देखील चांगल्या प्रमाणात असते, म्हणूनच जर तुम्ही ते जास्त खाल्ले तर तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. अनेकवेळा आपण पाहतो की आपल्या शरीराच्या अनेक भागांमध्ये ऍलर्जीप्रमाणे छोटे दाणे बाहेर पडतात, तर त्याचे कारण आपले शेंगदाणे देखील असू शकते. कारण शेंगदाण्यांचा प्रभाव उष्ण असतो. तुम्हालाही शरीरात अशीच काही चिन्हे दिसली तर शेंगदाणे खाणे थांबवू नका, तर त्याचे प्रमाण थोडे कमी करा. कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Pregnancy Health Tips : गरोदरपणात वारंवार भूक लागतेय? हे 'सुपर स्नॅक्स' खा आणि हेल्दी राहा