Astrology : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. सूर्यदेवाची (sunday Remedie) उपासना आणि उपायांसाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा म्हटले जाते. सूर्यदेवाच्या कृपेने व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते.


असे मानले जाते की, सूर्यदेवाच्या कृपेने माणूस नेहमी निरोगी राहतो. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती मिळते. परंतु जेव्हा कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत किंवा दुर्बल असते तेव्हा व्यक्तीला तणाव आणि संघर्षाचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत व्यक्तीने केलेले कामही बिघडू लागते. कुंडलीत सूर्य कमजोर असल्यामुळे व्यक्तीच्या करिअरमधील प्रगती थांबते. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध बिघडू लागतात. अशा स्थितीत रविवारी काही उपाय केल्यास राशीचा सूर्य बलवान होतो. तुमचे बिघडलेले काम पूर्ण होऊ लागते.


कुंडलीत सूर्यदेव बलवान होण्यासाठी उपाय


ज्योतिषशास्त्रानुसार रविवारच्या सूर्याला अर्घ्य द्यावे. यामुळे कुंडलीतील सूर्य बलवान होईल. सूर्याच्या ऊर्जेचा सर्व ग्रहांवर प्रभाव पडतो. रविवारी संध्याकाळी सूर्याला अर्घ्य दिल्याने व्यक्तीच्या जीवनातील ताणतणाव कमी होतो आणि व्यक्तीचा संघर्ष कमी होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.


ज्योतिष शास्त्रानुसार जर कुंडलीत सूर्य ग्रह अशुभ स्थितीत असेल किंवा अशक्त असेल तर एखाद्या व्यक्तीने रविवारी पिठाचे गोळे बनवून माशांना खाऊ घालावे. असे केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते. सूर्याच्या कृपेने माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात.


रविवारी उगवत्या सूर्याला जल अर्पण करून माता लक्ष्मीची (lakshmi mata) पूजा करावी. असे मानले जाते की असे केल्याने सूर्यदेव आणि माता लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही.


रविवारी सूर्यदेवाची उपासना करा आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. यामुळे माणसाच्या सर्व समस्या दूर होतात, असे म्हटले जाते.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता


Chanakya Niti : वाईट काळात असा स्वभाव कधीही अंगीकारू नका, नाहीतर तुमचाही गैरफायदा घेतला जाईल