Shoulder Pain Home Remedy : जिममध्ये वर्क-आऊट करताना झालेल्या दुखापतीमुळे अनेकांचे खांदे दुखतात. तसेच काहींना जॉइंट पेन होते. खांदेदुखीमुळे अनेकांना दरोरजची काम करताना समस्या जाणवतात. खांदेदुखीनं त्रस्त असणारे व्यक्ती जास्त वजन असलेल्या वस्तू उचलू शकत नाही. जर तुम्ही खांदेदुखीचा सामाना करत असाल तर तुम्ही हे घरगुती उपाय ट्राय करु शकता. यामुळे तुमची खांदेदुखी कमी होईल. पण हे उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


आइस थेरिपी 
आइस थेरिपीमुळे खांदेदुखी आणि सूज कमी होते. या थेरिपीमुळे खांद्यांचे टिशू हे सुन्न होतात. जर तुम्हाला खांद्याला दुखापत झाली असेल आणि त्यामुळे तुमचे खांदे दुखत असतील तर ही थेरिपी नक्की ट्राय करा. कारण ही थेरिपी मसल्स आणि स्टिफ जॉइन्ट्सला रिलॅक्स करते. खांदेदुखी आणि खांद्यांच्या आजूबाजूला असणारी सूज या थेरिपीमुळे कमी होते. ही थेरिपी करण्यासाठी एका मुलायम कापडामध्ये बर्फाचे काही तुकडे टाका आणि हे कपड खांद्यांना बांधा. 20 मिनीट हे कापड खांद्याला बांधा. असं रोज पाच वेळा केल्यानं तुमच्या खांद्यांचं दुखणं कमी होईल.


हॉट कम्प्रेशन 
हॉट कम्प्रेशन थेरिपी करण्यासाठी इलेक्ट्रिक हीटिंग पॅड किंवा गरम पाण्याची पिशवी मध्यम स्तरावर वापरा. हीट कम्प्रेशन रक्त प्रवाह उत्तेजित करते. खांदेदुखीपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही पाच ते दहा मिनिटांसाठी गरम शॉवरचा पर्यायही निवडू शकता. गरम शॉवरनं खांद्यांना हिट मिळते. त्यामुळे खांदेदुखी कमी होईल. 
 
सॉल्ट बाथ 
एप्सम सॉल्ट बाथ (मॅग्निसियम सल्फेट) घेतल्यानं खांदेदुखी कमी होते. तसेच ब्लड सर्कुलेशन वाढते. यासाठी अंघोळीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यमध्ये  एप्सम सॉल्ट  (मॅग्निसियम सल्फेट)  मिक्स करा आणि त्या पाण्यानं अंघोळ करा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :