Weekly Vrat 2023 : 18-24 सप्टेंबर 2023 दरम्यान अनेक महत्त्वाचे उपवास आणि सण साजरे केले जातील. भाद्रपद महिन्याचा हा तिसरा आठवडा आहे, ज्यामध्ये हरतालिका (Hartalika) तृतीया, गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023), गौरी आवाहन (Gauri Pujan) आणि ऋषीपंचमीसह (Rishi Panchami) विविध सण साजरे केले जातील.
सप्टेंबरचा तिसरा आठवडा व्रतवैकल्याचा!
सध्या भाद्रपद महिना सुरू असून आज सोमवार 18 सप्टेंबर 2023 पासून सप्टेंबरचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी आहे. आज चित्रा नक्षत्रासह इंद्र आणि रवि योग असतील. सप्टेंबरचा हा संपूर्ण आठवडा उपवास आणि सणांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक महत्त्वाचे उपवास आणि सण असतील. या सप्ताहाची सुरुवात हरतालिका तृतीया व्रताने झाली आहे. यासोबतच गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, गौरी आवाहन आणि गौरी-गणपती विसर्जन या आठवड्यात साजरे होणार आहेत. हिंदू धर्मानुसार, 18-24 सप्टेंबर 2023 दरम्यान येणार्या उपवास आणि सणांबद्दल माहिती जाणून घ्या.
सोमवार, 18 सप्टेंबर 2023, हरतालिका तृतीया : आज विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हरतालिका व्रत करतील. भाद्रपदात येणाऱ्या या सणाला हरतालिका तृतीया असेही म्हणतात. या दिवशी निर्जळी उपवास करण्याची परंपरा आहे. दिवसभर उपवास केल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो.
मंगळवार, 19 सप्टेंबर 2023, गणेश चतुर्थी : गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी येईल. या दिवसापासून 10 दिवसांचा गणेशोत्सव सुरू होणार आहे. गणेश चतुर्थीला घरोघरी, मंदिरात, कार्यालयात आणि पूजा मंडपात बाप्पाची मूर्ती बसवली जाईल आणि दहा दिवस पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला त्याचे विसर्जन केले जाईल.
बुधवार, 20 सप्टेंबर 2023 ऋषी पंचमी : पंचांगानुसार, ऋषी पंचमी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते, जी या वर्षी 20 सप्टेंबर रोजी येत आहे. ऋषीपंचमीचे व्रत प्रत्येकजण करू शकतो. या दिवशी सप्तऋषींची पूजा करून जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी हे व्रत केले जाते.
गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 गौरी आवाहन : लाडक्या गणपती बाप्पाचे यावर्षी 19 सप्टेंबर या दिवशी जल्लोषात आगमन होत आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आपल्याला वेध लागतात ते जेष्ठा गौरी आवाहनचे. 21 सप्टेंबर गुरुवार या दिवशी जेष्ठा गौरी आवाहन होत असून पुढे गौरी पुजन आणि विसर्जन असा त्या व्रताचा विधी असतो. 21 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी आवाहन सकाळी 06:12 वाजेपासून ते दुपारी 03.34 पर्यंत
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठागौरी पूजन : दुसर्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे महापूजन होतं. या दिवशी पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात.
शनिवार, 23 सप्टेंबर 2023 गौरी विसर्जन : तिसर्या दिवशी मूल नक्षत्रात गौरीचे खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून विसर्जन करतात. या दिवशी कापसाचे गाठ बांधतात. सूतमध्ये हळद, कोरडे फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, काजूची फुलं, रेशीम धागा मिसळतात. गौरी पूजन करुन आरती करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या
Ganesh Chaturthi 2023: यंदाची गणेश चतुर्थी खास! तब्बल 300 वर्षांनंतर बनणार अद्भुत योग, जाणून घ्या