Ganesh Chaturthi 2023 : पौराणिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाला (Lord Ganesh) आद्य देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा अवश्य केली जाते. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आहे. ज्योतिषांच्या मते, यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी साजरी होणार असून भाविक घरी गणपतीची मूर्ती आणून त्यांची भक्तिभावाने पूजा करतील. मात्र यंदा तब्बल 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एक विलक्षण योगायोग घडत आहे. जाणून घ्या.


 


गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ योगायोग


ज्योतिषांच्या मते, यंदा तब्बल 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एक विलक्षण योगायोग घडत आहे. यंदा अंगारक योगात ही चतुर्थी आल्याने खास महत्व प्राप्त झाले आहे. तसेच यंदा गणेश चतुर्थीला ब्रह्मयोग आणि शुक्ल योग असे शुभ योग तयार होत आहेत. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीपासून देशभरात गणेश चतुर्थी उत्सव सुरू होतो. हा उत्सव प्रामुख्याने 10 दिवस चालतो. या वेळी भक्त बाप्पाला आपल्या घरी आणतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देतात. ज्योतिषांच्या मते, दिनदर्शिकेनुसार गणेश चतुर्थीचा पवित्र सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. गणेश महोत्सवाचा उत्सव चतुर्थी तिथीपासून सुरू होतो. पुढील 10 दिवस चालतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाला निरोप दिला जातो. यावेळी उदय तिथीवर आधारित गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. 


 


श्रीगणेशाची विशेष पूजा
ज्योतिषींनी सांगितले की, 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेशोत्सव साजरा केली जाईल. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात व घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून 10 दिवस बाप्पाची आराधना करून बाप्पा लवकर यावेत, अशी मनोकामना करून त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर रोजी श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून श्रीगणेशाची विशेष पूजा करण्यात येणार आहे. गणपतीची मूर्ती विशिष्ट पद्धतीने बसवली जाते.


 


श्री गणेशाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त


यंदाच्या वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 ला आहे. पंचांगानुसार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ होईल, तर 19 सप्टेंबर रोजी 1 वाजून 42 मिनिटांनी चतुर्थी समाप्त होईल. त्यामुळे श्री गणेश चतुर्थी उदयोतिथीनुसार 19 सप्टेंबरला साजरी केली जाईल आणि या दिवसापासूनच गणेशोत्सवाला सुरुवात होईल. श्री गणेशाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 7 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत आहे.



गणेश विसर्जन तारीख 
ज्योतिषांच्या मते, शास्त्रानुसार गणेश चतुर्थी उत्सव अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपतो. तसेच या दिवशी बाप्पाला श्रद्धेने निरोप दिला जातो. दिनदर्शिकेनुसार, गणेश विसर्जन गुरुवार, 28 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.


 


गणेश चतुर्थी 2023 महत्व


ज्योतिषाने सांगितले की, हिंदू धर्मात भगवान गणेश हे पहिले पूजनीय देवता तसेच बुद्धी, आनंद, समृद्धी देणारे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला स्वाती नक्षत्रात आणि सिंह राशीत झाला होता. अशा परिस्थितीत जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी गणपतीची मूर्ती बसवणार असाल तर ती दुपारच्या शुभ मुहूर्तावर करावी. गणेश चतुर्थीच्या तारखेपासून अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे सलग 10 दिवस गणपतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. श्रीगणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


 


संबंधित बातम्या


Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीच्या आधी 'हा' ग्रह बदलतोय चाल, तुमच्या राशीवर काय परिणाम होईल?