Weekly Panchang 02-08 oct 2023 : हिंदू पंचांगला वैदिक पंचांग देखील म्हणतात. पंचांगाद्वारे वेळ आणि काळाची गणना केली जाते. पंचांग हे 5 भागांचे बनलेले आहे जे खूप महत्वाचे आहेत, या माध्यमातून शुभ, अशुभ काळ, योग आणि नक्षत्राची माहिती मिळते. या आठवड्यात येणारी संकष्टी चतुर्थी, रविपुष्य योग, शुभ काळ आणि राहुकाळसोबतच आठवड्याचे पंचांग जाणून घ्या. पुढील 7 दिवसांचे योग, नक्षत्र आणि व्रतांबद्दल जाणून घ्या.


 


साप्ताहिक पंचांग 2 ऑक्टोबर - 8 ऑक्टोबर 2023, शुभ काळ, राहुकाळ जाणून घ्या


ऑक्टोबरचा पहिला आठवडा 2 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी जयंतीपासून (Mahatma Gandhi Jayanti) सुरू होत आहे. या दिवशी, सोमवारी, अश्विन महिन्यातील संकष्टी चतुर्थी येईल. जीवनातील अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी बाप्पाची पूजा केली जाते. या सप्ताहाची समाप्ती 08 ऑक्टोबर 2023 रोजी रविपुष्य योगाने होईल. या सप्ताहात महालक्ष्मी व्रत, कालाष्टमी आणि नवमीला आईचे श्राद्ध केले जाईल. 7 दिवस कोणते सण, व्रत, ग्रह बदल आणि शुभ योग असतील ते जाणून घ्या.


 


2 ऑक्टोबर 2023 (पंचांग 02 ऑक्टोबर 2023)
व्रत आणि सण - विघ्नराज संकष्टी चतुर्थी, चतुर्थी श्राद्ध
तिथी - तृतीया
पक्ष - कृष्णा
वार - सोमवार
नक्षत्र - भरणी
योग - हर्षण
राहुकाळ - सकाळी 07.43 ते सकाळी 9:12
ग्रहांचे संक्रमण - सिंह राशीमध्ये शुक्राचे संक्रमण



3 ऑक्टोबर 2023
व्रत आणि सण - पंचमी श्राद्ध
तिथी - पंचमी
पक्ष - कृष्ण
वार - मंगळवार
नक्षत्र - कृतिका
योग - वज्र, सर्वार्थ सिद्धी योग
राहुकाळ - दुपारी 03:08 ते संध्याकाळी 6:04
ग्रहांचे संक्रमण - मंगळ तूळ राशीत प्रवेश करेल



4 ऑक्टोबर 2023
व्रत आणि सण - षष्ठी श्राद्ध
तिथी - षष्ठी
पक्ष - कृष्ण
वार - बुधवार
नक्षत्र - रोहिणी
योग - सिद्धी, व्यतिपात, सर्वार्थ सिद्धी, रवि योग
राहुकाळ - दुपारी 12.10 ते 01.38 पर्यंत



5 ऑक्टोबर 2023 
व्रत आणि सण - सप्तमी श्राद्ध
तिथी - सप्तमी
पक्ष - कृष्ण
वार - गुरुवार
नक्षत्र - मृगाशीर्ष
योग - वरियान, रवि योग
राहुकाळ - दुपारी 12.10 ते 01.38 पर्यंत



6 ऑक्टोबर 2023 
व्रत आणि सण - अष्टमी श्राद्ध, कालाष्टमी
तिथी - सप्तमी
पक्ष - कृष्ण
वार - शुक्रवार
नक्षत्र - आद्रा
योग - परिघ, सर्वार्थ सिद्धी योग
राहुकाळ - सकाळी 10:41 ते दुपारी 12:09



7 ऑक्टोबर 2023
उपवास आणि सण - नवमी श्राद्ध
तिथी - अष्टमी
पक्ष - कृष्ण
वार - शनिवार
नक्षत्र - पुनर्वसु
योग - शिव
राहुकाळ - सकाळी 09.13 ते 10.41



8 ऑक्टोबर 2023 
व्रत आणि सण - रविपुष्य योग, दशमी श्राद्ध
तिथी - नवमी
पक्ष - कृष्ण
वार - रविवार
नक्षत्र - पुष्य
योग - सिद्धी, रविपुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग
राहुकाळ - 04.32 सायंकाळी – 06.00 सायंकाळी


 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Monthly Horoscope October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींना अनेक लाभ, इतर राशींचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या