Surya Grahan 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार दरवर्षी सूर्य आणि चंद्रग्रहण होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होते, तेव्हा त्याचा परिणाम सर्व लोकांच्या जीवनावर होतो. धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. 2023 मध्ये चार ग्रहण होतील. धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे. ज्योतिषांच्या माहितीनुसार 2023 वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.



वर्षातील दुसरे सूर्यग्रहण
हे ग्रहण शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2:25 वाजता समाप्त होईल. हे ग्रहण कंकणकृती सूर्यग्रहण असेल, जे भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला होईल. विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण कन्या आणि चित्रा नक्षत्रात होईल. यावर्षी 2 सूर्यग्रहण होणार आहेत. एक सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात झाले तर दुसरे सूर्यग्रहण ऑक्टोबरमध्ये होणार आहे. याला कंकण सूर्यग्रहण असे म्हटले जाईल.



हिंदू धर्मात ग्रहणाला खूप महत्त्व 
ज्योतिषांनी सांगितले ,हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार ग्रहणाच्या सुतक कालावधीला खूप महत्त्व आहे, त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. हिंदू धर्मात ग्रहणाला खूप महत्त्व आहे. खगोलीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दोन्ही महत्त्वाच्या घटना मानल्या जातात. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मधून जातो, तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. याला सूर्यग्रहण असे नाव देण्यात आले आहे. चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर इतके असते की, चंद्र सूर्याच्या अगदी मध्यभागी येतो, अशा स्थितीत सूर्याभोवती एक वलय तयार होतो, या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात.



भारतात दिसणार की नाही?
ज्योतिषाने सांगितले की वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे, जे भारतात दिसणार नाही. त्यामुळे देशात त्याचे कोणतेही धार्मिक महत्त्व राहणार नाही. हे सूर्यग्रहण टेक्सासपासून सुरू होऊन मेक्सिको तसेच मध्य अमेरिका, कोलंबिया आणि ब्राझीलच्या काही भागांतून पुढे जाऊन अलास्का आणि अर्जेंटिना येथे दिसणार आहे. ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही. भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण रात्री 8:34 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 2:25 पर्यंत चालेल. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण उपच्छाया ग्रहण असेल, ज्यामुळे त्याचा प्रभाव भारतात दिसणार नाही. त्याचा प्रभाव कोणत्याही राशीवर फारसा दिसणार नाही.  हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल जे भारतात होणार नाही.


 


सूर्यग्रहण कुठे दिसणार?
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेचे क्षेत्र वगळता उत्तर अमेरिका, कॅनडा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, ग्वाटेमाला, मेक्सिको, अर्जेंटिना, कोलंबिया, क्युबा, बार्बाडोस, पेरू, उरुग्वे, अँटिग्वा, व्हेनेझुएला, जमैका, हैती, पॅराग्वे, ब्राझील या देशांमध्ये दिसणार असल्याचे ज्योतिषींनी सांगितले.



सूर्यग्रहणाचा परिणाम, नैसर्गिक आपत्तींची भीती
ज्योतिषांच्या मते, ग्रहणामुळे पूर्वीपेक्षा नैसर्गिक आपत्तींची चिन्हे अधिक दिसत आहेत. भूकंप, पूर, त्सुनामी, विमान अपघात, काही मोठे गुन्हेगार देशात परतण्याचे संकेत आहेत. नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी होण्याची शक्यता फारच कमी असते. चित्रपट आणि राजकारणातील एखादी दुःखद बातमी तसेच व्यवसायात तेजी येईल. आजार कमी होतील. रोजगाराच्या संधी वाढतील. उत्पन्न वाढेल. विमान अपघाताची शक्यता. राजकीय अस्थिरता म्हणजेच राजकीय वातावरण जगभर जास्त असेल. राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक होतील. सत्ता संघटनेत बदल होतील. जगभरातील सीमांवर तणाव सुरू होईल. देशात आंदोलन, हिंसाचार, निदर्शने, संप, बँक घोटाळे, विमान अपघात, विमानातील बिघाड, दंगली आणि जाळपोळ अशा घटना घडू शकतात.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणात 'या' राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार! चांगले दिवस येणार, ज्योतिषशास्त्रात म्हटंलय...