Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणात 'या' राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार! चांगले दिवस येणार, ज्योतिषशास्त्रात म्हटंलय...
Surya Grahan 2023 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी झाले. आता वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबरला होणार आहे. हे ग्रहण काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे.
surya grahan 2023 astrology marathi news
1/10
वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी झाले. आता 14 ऑक्टोबर रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे.
2/10
हे सूर्यग्रहण रात्री 8:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2:25 वाजता संपेल.
3/10
ज्योतिषशास्त्रानुसार 2023 सालचे सूर्यग्रहण काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे.
4/10
चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल ज्यांना या सूर्यग्रहणाचा फायदा होणार आहे.
5/10
मकर- मकर राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचा विशेष लाभ होईल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही काही जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता
6/10
सिंह- 14 ऑक्टोबरला होणारे सूर्यग्रहण सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. या राशीचे लोक जे व्यवसायात गुंतलेले आहेत, त्यांना काही मोठे लाभ मिळू शकतात. तुमच्या शत्रूंचा पराभव होईल. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाल.
7/10
मिथुन- या राशीच्या लोकांसाठी वर्षातील दुसरे सूर्यग्रहण खूप चांगले असणार आहे. या राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करतील. कुठेतरी अडकलेले पैसे मिळतील. घरात सुख-समृद्धी येईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल.
8/10
तूळ- वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम घेऊन आले आहे. या राशीच्या लोकांना पद, पैसा, प्रतिष्ठा या सर्व गोष्टींचा लाभ मिळेल. या लोकांचा समाजात सन्मान वाढेल. प्रत्येक कामात यश मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल.
9/10
वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही हे ग्रहण खूप शुभ असणार आहे. या ग्रहण काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या मेहनतीला फळ मिळेल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 08 Oct 2023 01:14 PM (IST)