Navratri 2023 : आज शारदीय नवरात्रीचा सातवा दिवस आहे. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या (Goddess Durga) विविध रूपांना समर्पित आहेत. या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या काळात केलेले उपाय खूप फायदेशीर मानले जातात. या उपायांचे पालन केल्याने घरात सुख-समृद्धी येते. काही उपाय केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते.
नवरात्रीचे हे उपाय वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर करतात
नवरात्रीमध्ये काही उपाय केल्याने देवी मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. नवरात्रीचे हे उपाय वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर करतात. जाणून घ्या
जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या येत असतील तर निळ्या रंगाचे कपडे परिधान करा आणि कालरात्रीची पूजा करा.
देवीसमोर दिवा लावा आणि त्यांना तुमची समस्या सांगा.
असे केल्याने देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो.
देवी कालरात्रीच्या पूजेच्या वेळी तिला निळी फुले आणि पिवळ्या हळदीच्या तीन गाठी अर्पण करा.
देवीच्या विवाह मंत्राचा जप करा
पूजेनंतर हळद एका कपड्यात बांधून त्याची गाठ आपल्याजवळ ठेवा.
देवी मातेच्या कृपेने लवकर विवाह होण्याची शक्यता वाढते
लग्नात उशीर होत असेल किंवा जन्मकुंडलीत लग्नाची शक्यता नसेल तर या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी पूजा केल्यानंतर देवी मातेच्या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. मखाणासोबत नाणी मिसळून देवीला अर्पण करून गरिबांमध्ये वाटल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता वाढते. नवरात्रीच्या शेवटच्या रात्री देवीच्या समोर बसून खऱ्या मनाने प्रार्थना करावी. लाल रंगाच्या चुनरीमध्ये हळद, चांदीचे दोन नाणे ठेवा आणि मातेला अर्पण करा. यामुळे वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
नवरात्रीत देवीच्या विवाह मंत्राचा जप करा
‘पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानु सारिणीम्| तारिणींदुर्गसं सारसागरस्य कुलोद्भवाम्॥’ या मंत्राचा अर्थ असा आहे की, "हे देवी, मला एक सुंदर जोडीदार दे, जो माझ्या मनाच्या इच्छेनुसार असेल, जो मला संसाराच्या अगम्य महासागरातून वाचवेल आणि चांगल्या कुळात जन्म घेईल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीमध्ये सकाळी स्नान आणि ध्यान करून देवीची पूजा करावी. या मंत्राचा 11 वेळा जप करा. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीमध्ये सकाळी स्नान आणि ध्यान करून देवीची पूजा करावी. या मंत्राचा 11 वेळा जप करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Durgashtami 2023: दुर्गाष्टमीला दोन शुभ योगांचा संयोग, देवीच्या आशीर्वादाने तुमचे नशीब चमकेल! जाणून घ्या