Navratri 2023 : नवरात्रीच्या दिवसात कन्यापूजेला (Kanya Pujan 2023) विशेष महत्त्व आहे. या दिवसात उपवास करणारे भाविक कन्याभोजन करूनच उपवास सोडतात. शास्त्रानुसार, मुलींना देवी मातेचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी मुलींना जेवण दिल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कन्याभोजन करताना नऊ मुली असणे आवश्यक आहे. असे मानले जाते की जर कन्यापूजन करताना मुलींचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि त्यांचे जीवन समृद्ध राहते.



नवरात्रीमध्ये कन्यापूजनला खूप महत्त्व



ज्योतिषांच्या मते, नवरात्रीमध्ये कन्यापूजनला खूप महत्त्व आहे. साधारणत: नवमीच्या दिवशी कन्यापूजन करून त्यांना भोजन दिले जाते. पण काही भाविक अष्टमीला कन्यापूजाही करतात. नवरात्रीच्या काळात अष्टमी आणि नवमीच्या दिवशी मुलींना भोजन देण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. यामागील शास्त्रात सांगितलेले तथ्य असे आहे की, 2 ते 10 वर्षे वयोगटातील नऊ मुलींना आहार दिल्यास सर्व प्रकारचे दोष दूर होतात.


 


कोणत्या मुहूर्तावर कराल कन्यापूजन?


मुलींना भोजन देण्यापूर्वी देवीला नैवेद्य दाखवावा. देवीला अर्पण केलेल्या वस्तूही या मुलींना अर्पण कराव्यात. यानंतर मुलींची पूजा करा. जर कन्याभोजन करणे शक्य नसेल तर तांदूळ, पीठ, भाजीपाला, फळे असा स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य तिच्या घरी देऊ शकतो, यामुळे देवीचा आशीर्वाद मिळतो



कन्यापूजेसाठी शुभ मुहूर्त



अष्टमीला पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 07.51 ते 10.41 आणि दुपारी 01.30 ते 02.55 पर्यंत आहे. 
महानवमीचा शुभ मुहूर्त सकाळी 06.27 ते 07.51 आणि दुपारी 1.30 ते 02.55 पर्यंत आहे.



प्रत्येक वयोगटातील मुलींना वेगळे महत्त्व 



ज्योतिषांच्या मते की 2 वर्षाच्या मुलीला कुमारीका म्हणतात. त्यांच्या उपासनेने दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होते. 
3 वर्षांची मुलगी त्रिमूर्ती मानली जाते. त्रिमूर्तीच्या पूजेने कुटुंबात संपत्ती आणि समृद्धी येते. 
4 वर्षांची मुलगी कल्याणी मानली जाते. त्यांची पूजा केल्याने सुख-समृद्धी मिळते. 
5 वर्षांची मुलगी रोहिणी मानली जाते. त्यांची पूजा केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते.
6 वर्षांची मुलगी कालिका मानली जाते. त्यांची पूजा केल्याने ज्ञान आणि राजयोग प्राप्त होतो. 
7 वर्षांची मुलगी चंडिका मानली जाते. त्यांची पूजा केल्याने समृद्धी प्राप्त होते. 
8 वर्षाच्या मुलीचे नाव शांभवी आहे. त्यांची पूजा केल्याने प्रसिद्धी मिळते. 
9 वर्षांच्या मुलीला दुर्गा म्हटले आहे. त्यांची पूजा केल्याने शत्रूंचा पराभव होतो आणि अशक्य कामे पूर्ण होतात. 
10 वर्षांची मुलगी सुभद्रा. सुभद्राची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि सुखाची प्राप्ती होते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Durgashtami 2023: दुर्गाष्टमीला दोन शुभ योगांचा संयोग, देवीच्या आशीर्वादाने तुमचे नशीब चमकेल! जाणून घ्या