Navratri 2023 : हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. देवी दुर्गाला समर्पित नवरात्रीचा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. संपूर्ण नऊ दिवस देवी आदिशक्ती जगदंबेची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावर्षी शारदीय नवरात्र रविवार, 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत आहे.



शारदीय नवरात्रीचा शुभ मुहूर्त
ज्योतिषांच्या मते, हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. रविवार 15 ऑक्टोबर 2023 पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्री संपणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जाणार आहे. आश्विन महिन्याची प्रतिपदा तिथी 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11:24 पासून सुरू होईल. हे 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:32 पर्यंत चालेल. उदय तिथीनुसार 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे.


 


दुर्गा देवीच्या नऊ रूपांचीही पूजा
अश्विन महिन्यात येणारा शारदीय नवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यामध्ये दुर्गा देवीच्या मूर्ती ठिकठिकाणी विराजमान होतात. तसेच अनेक ठिकाणी गरबा, रामलीलाचे आयोजन केले जाते. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि दुर्गा देवीच्या नऊ रूपांचीही पूजा केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्येही उपवास केला जातो. देवी दुर्गेची पूजा नियम आणि भक्तीभावाने केली जाते.


 


शारदीय नवरात्रीच्या तिथी
15 ऑक्टोबर 2023 - देवी शैलपुत्री (पहिला दिवस) प्रतिपदा तिथी
16 ऑक्टोबर 2023 - देवी ब्रह्मचारिणी (दुसरा दिवस) द्वितीया तिथी
17 ऑक्टोबर 2023 - देवी चंद्रघंटा (तिसरा दिवस) तृतीया तिथी
18 ऑक्टोबर 2023 - देवी कुष्मांडा (चतुर्थी दिवस) चतुर्थी तिथी
19 ऑक्टोबर 2023 - देवी स्कंदमाता (पाचवा दिवस) पंचमी तिथी
20 ऑक्टोबर 2023 - देवी कात्यायनी (सहावा दिवस) षष्ठी तिथी
21 ऑक्टोबर 2023 - देवी कालरात्री (सातवा दिवस) सप्तमी तिथी
22 ऑक्टोबर 2023 - देवी महागौरी (आठवा दिवस) दुर्गा अष्टमी
23 ऑक्टोबर 2023 - महानवमी, (नववा दिवस) शारदीय नवरात्रीचा उपवास.
24 ऑक्टोबर 2023 - देवी दुर्गा मूर्तीचे विसर्जन, दशमी तिथी (दसरा)



शारदीय नवरात्रीचे महत्व
धार्मिक शास्त्रानुसार भगवती दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी नवरात्र हा सर्वोत्तम काळ आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा प्रत्येक दिवस मातेच्या विशिष्ट रूपाला समर्पित असतो आणि प्रत्येक रूपाला वेगळे वैभव असते. आदिशक्ती जगदंबेच्या प्रत्येक रूपाने वेगवेगळ्या इच्छा पूर्ण होतात. हा सण म्हणजे स्त्री शक्तीच्या पूजेचा सण आहे.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Monthly Horoscope October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 'या' राशींना अनेक लाभ, इतर राशींचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या