Ashadhi Wari Palkhi 2023 : आषाढी  यात्रेसाठी  देहू  येथून प्रस्थान होणाऱ्या तुकोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आज डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्वाचे विधिवत पूजन करून अकलूज येथून प्रस्थान झाले. थोर योद्धे राणा प्रतापसिंह यांच्या चेतक या अश्वाचा बलराज हा वंशज असून अतिशय सुलक्षणी आणि देखणा बलराज रिंगणाची शोभा वाढवणार आहे .


अकलूज येथील प्रतापगड या मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी बलराजला  सजवून आणण्यात आले . येथे डॉ धवलसिंह  मोहिते पाटील यांनी बलराज याचे विधिवत पूजन केले . बलराज हा चार वर्षे वयाचा मारवाड जातीचा अबलख अश्व असून  पालखी सोहळ्यातील रिंगण सेवेसाठी पाठवण्यात आला आहे.  पालखी सोहळ्यात पाठवण्यापूर्वी या अश्वाला रोजी एक तास दौडण्याचा सराव दिला जातो. त्याला दररोज जऊ, बाजरी उकडुन त्यात गुळ घालून खाऊ घातली जाते. त्याचबरोबर गव्हाचा भुसा व सुका चाराही देण्यात येतो. पालखी सोहळ्यात असताना त्याची क्षमता टिकून राहण्यासाठी दररोज खुराकाबरोबरच कोमट पाण्यात गुळ पातळ करून पाजला जातो. सोहळ्यावरून आल्यावर त्यास पुर्ण आराम देण्यात येतो. पालखी सोहळा कालावधीत सुमारे दोन कोटी लोक अश्वाला स्पर्श करून दर्शन घेतात. अश्वाबरोबर शशीकांत बीटे हा स्वार व हसन शेख हा सेवक पाठवला आहे . बलराज हा यंदा दुसऱ्यांदा पालखी सोहळ्यात सामील होत असून रिंगण सोहळ्यात जरी पटक्याचा मानाचा अश्व म्हणून धावणार आहे. 


पंढरपूर येथे आषाढी  यात्रा भरते. त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना होत असतात. त्याच प्रमाणे देहू  येथून उद्या तुकोबा रायांच्या पालखीचे पंढरपूसाठी प्रस्तान होणार आहे. याच पालखीसाठी आज डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बलराज या अश्वाचे विधिवत पूजन करून अकलूज येथून प्रस्थान झाले. थोर योद्धे राणा प्रताप सिंह यांच्या चेतक या अश्वाचा बलराज असून अतिशय सुलक्षणी आणि देखणा बलराज रिंगणाची शोभा वाढवणार आहे.