Pitru Paksha 2023 : शास्त्रात सांगितले आहे की, पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात. त्यामुळे या काळात पितरांचे श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान वगैरे करण्याची परंपरा आहे. पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवसापर्यंत असतो. या वर्षी पितृ पक्ष 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे. पितृपक्षाव्यतिरिक्त आपण आपल्या पूर्वजांची घरी पूजा करतो. यासाठी प्रत्येकजण आपापल्या घरी आपल्या पूर्वजांची छायाचित्रे ठेवतात.


 


घरामध्ये मृत पितरांचे फोटो लावताना हे नियम पाळा



अनेकदा हिंदू कुटुंबात, एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला की, त्याचा/तिचा फोटो घरी लावला जातो. फोटोवर हार घालून त्याची नित्य पूजा केली जाते. पण घरामध्ये मृत पितरांचे फोटो लावण्याबाबत शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


 


देवासोबत पूर्वजांची छायाचित्रे ठेवू नका



काही लोकांचे असे मत आहे की, ज्याप्रमाणे देवाची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे आपणही आपल्या पूर्वजांची पूजा करतो, पण माहितीच्या अभावामुळे लोक देवासोबत पूर्वजांचे फोटो ठेवतात. पितरांचे स्थान कितीही उच्च असले तरी देवतांसह त्यांची पूजा करू नये. त्यामुळे पूर्वजांचे फोटोही वेगळे ठेवावेत.



जास्त फोटो लावू नका



वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पितरांचे जास्त फोटो लावू नयेत. तसेच, हे फोटो अशा ठिकाणी लावू नका जिथे प्रत्येकजण ते पाहू शकेल.



अशा ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नका



वास्तूनुसार बेडरूममध्ये, घराच्या मध्यभागी आणि स्वयंपाकघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. यामुळे घरगुती कलह वाढतो आणि घरात अशांतता निर्माण होते.



पूर्वजांचे फोटो लावण्याची दिशा



वास्तुशास्त्रात सर्व लहान-मोठ्या गोष्टींसाठी दिशा दिली आहे. वास्तुशास्त्रात उत्तराभिमुख भिंत पूर्वजांचे फोटो लावणे शुभ मानले जाते. कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. अशा स्थितीत उत्तरेकडील भिंतीवर फोटो लावून पितरांचे तोंड दक्षिणेकडे होते.



जिवंत लोकांसोबत पूर्वजांचे फोटो लावू नका



जिवंत लोकांसोबत मृत पूर्वजांचे फोटो लावणे टाळा. असे मानले जाते की यामुळे जिवंत व्यक्तीचे आयुष्य कमी होते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Pitru Paksha 2023 : पितृपक्षात दाढी, मिशा, नखं आणि केस कापावेत की नाही? शास्त्रानुसार काय आहेत नियम? जाणून घ्या