Shani Dev : पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौष अमावस्या म्हणतात. पौष अमावस्या उद्या म्हणजेच ११ जानेवारीला आहे. अमावस्या तिथीला धर्म आणि ज्योतिष शास्त्रात खूप महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी अनेक धार्मिक कार्ये केली जातात. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि श्राद्ध केले जाते. पितृदोष आणि कालसर्प दोष यापासून मुक्त होण्यासाठीही या दिवशी उपवास केला जातो. पौष महिन्यातील अमावास्येला काही विशेष काम केल्याने शनिदेवाची कृपा होते आणि त्याच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते.
पौष अमावस्येला शनिदेवाची 'अशी' कृपा मिळवा
शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्येचा दिवस खूप चांगला मानला जातो. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.
पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि शनि ॐ शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा.
अमावस्येच्या दिवशी शनि मंदिरात अवश्य जा आणि शनिदेवाच्या मूर्तीवर मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल अर्पण करा. यामुळे शनीच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो.
मार्गशीर्ष महिना अत्यंत पुण्यपूर्ण आणि फलदायी असल्याचे सांगितले आहे.
मार्गशीर्ष अमावस्येला शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि स्तोत्रासह दशरथकृत शनि स्तोत्राचे पठण करावे.
या दिवशी हनुमान मंदिरात गेल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो.
या दिवशी गरिबांना काळे तीळ किंवा मोहरीचे तेल दान करा.
या दिवशी चुकूनही मांसाहार किंवा मद्य सेवन करू नये.
घराजवळ कुठेतरी शमीचे झाड असेल तर त्यावर पाणी, मोहरीचे तेल, काळे तीळ, गूळ इत्यादी अर्पण करून पूजा करावी.
या दिवशी शनिदेवाची प्रतिमा, यंत्र किंवा मूर्तीसमोर शनी मंत्र किंवा चालिसाचा जप करावा.
मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी संपूर्ण उडीद, लोखंड, तेल, तीळ, पुष्कराज रत्न आणि काळे वस्त्र दान करणे उत्तम.
या दिवशी शुभ शनियंत्र घरी आणून त्याची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.
शनीची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी 7 मुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर आहे.
भगवान शंकर हे शनिदेवाचे गुरु मानले जातात.
त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची पूजा करून शिवलिंगावर तीळ जल अर्पण करणाऱ्यांना शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: