Magh Purnima 2024 : शास्त्रात ज्या तिथीला अमृततिथी म्हणतात, अशी ही आजची माघ पौर्णिमा खूप खास आहे. कारण आज अनेक शुभ योगायोग होत आहेत. पंचांगानुसार 23 फेब्रुवारीला दुपारी 3.33 वाजता पौर्णिमा तिथीला प्रारंभ झाला, मात्र उदय तिथीप्रमाणे 24 फेब्रुवारीला ही पौर्णिमा आज साजरी होत आहे. 


या पौर्णिमेला अनेक शुभ योग तयार होतायत


माघ महिना हा शुभ महिना मानला जातो. शास्त्रानुसार, या दिवशी गंगा स्नान, विष्णूची पूजा आणि दान केल्याने अनंत पुण्य लाभ होतो. या पौर्णिमेला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी मघा नक्षत्र राहील. त्याचबरोबर अतिगंड आणि सुकर्मा सोबतच पद्य योग तयार होत आहे. माघी पौर्णिमेला ग्रह संक्रमणाचा शुभ संयोग होत आहे. अशा शुभ योगात माघ पौर्णिमेला पवित्र नदी किंवा नदीच्या संगमात स्नान, पूजा आणि दान केल्याने सूर्य-चंद्राच्या अशुभांपासून मुक्ती, सौभाग्य, संततीप्राप्ती आणि संकटांपासून मुक्ती मिळते.


 


पौर्णिमा तिथी : सूर्योदय ते संध्याकाळी 6.30
अभिजित मुहूर्त: दुपारी 11.34 ते 12.20 पर्यंत
अमृत ​​काल : संध्याकाळी 07.38 ते 09.26 पर्यंत
शुभ योग मुहूर्त: सकाळी 7.45 ते 9.11


 


शनिदशा शांत करण्यासाठी आजचा दिवस खास!


माघ पौर्णिमेला शोभन योग तयार होत आहे. शुक्र हा शोभन योगाचा कारक मानला जातो. शुक्राच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. याशिवाय कुंभ राशीमध्ये सूर्य, शनि आणि बुद्ध यांचा त्रिग्रही योग तयार होत आहे, ज्यामुळे अनेक राशींना फायदा होईल. शनिवारी येणा-या माघ पौर्णिमेचे महत्त्व अधिकच वाढते कारण जर तुमच्या कुंडलीत शनीचा नकारात्मक प्रभाव असेल तर माघ पौर्णिमेला तुम्ही असे काही उपाय करू शकता, ज्यामुळे शनिदशा शांत होऊ शकते.


 


माघ पौर्णिमा पूजा विधी


माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा पूर्ण विधीपूर्वक करावी. 
या दिवशी पिवळ्या रंगाची फळे, फुले व कपडे भगवान विष्णूला अर्पण करावेत.
गुलाबी किंवा लाल रंगाची फुले आणि श्रृंगाराचे साहित्य लक्ष्मी मातेला अर्पण करावे. 
माघ पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथा वाचणे पुण्यकारक मानले जाते. 
माघ पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. 
नदीत स्नान करता येत नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून घरी स्नान करावे. 
माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने घरात सुख, संपत्ती आणि समृद्धी नांदते.


 


उपाय


पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला अर्घ्य दिल्याने चंद्रदेवाची कृपा सदैव राहते. यामुळे मानसिक सुख आणि शांतीही राहते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Mahashivratri 2024 :  यंदाची महाशिवरात्री खास! भगवान शिवाने स्वतः सांगितलेला व्रताचा महिमा माहित आहे? जाणून घ्या त्याचे महत्त्व