Kartik Purnima 2023 : कार्तिक पौर्णिमा सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. शास्त्रामध्ये कार्तिक पौर्णिमा ही पूजा, नदी स्नान आणि दानासाठी अत्यंत शुभ मानली गेली आहे. या पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. या तिथीला भगवान विष्णूंनी मत्स्याचा अवतार घेऊन विश्वाला प्रलयातून वाचवले. यामुळे कार्तिक पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि आरोग्याचे वरदानही मिळते. यावर्षी कार्तिक पौर्णिमेला अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे ज्यामध्ये काही राशींना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि नोकरी-व्यवसायासह धनलाभ होईल.


कार्तिक पौर्णिमा 2023 शुभ योग


पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमा 26 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 03.53 ते 27 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 02.45 पर्यंत राहील. हिंदू धर्मात उदयतिथीला महत्त्व आहे. उदय तिथीनुसार यंदा 27 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाईल.  कार्तिक पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी योग आणि शिवयोग यांचा संयोग होत आहे. यासोबतच यंदा कार्तिक पौर्णिमा सोमवारी आहे. सोमवारी येणारी पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी शिवाची पूजा केल्याने चंद्र दोष दूर होतो आणि लक्ष्मीच्या पूजेने आर्थिक समस्या दूर होतात. या दिवशी सूर्य आणि मंगळ वृश्चिक राशीत असतील.  या योगात विधिवत पूजन केल्याने दुप्पट लाभ होतो, अशी मान्यता आहे.


कार्तिक पौर्णिमा 2023 भाग्यशाली राशी


वृषभ - कार्तिक पौर्णिमेचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. एखाद्या मोठ्या कामात यश मिळू शकते. शत्रूंवर विजय मिळेल आणि धनप्राप्तीतील अडथळे नष्ट होतील. लक्ष्मी आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादाने धनात वृद्धी होईल. तब्येत सुधारेल.


कन्या - कार्तिक पौर्णिमेला घडणाऱ्या शुभ संयोगांमुळे कन्या राशीच्या लोकांचे भाग्य जागृत होईल. त्यांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात चांगला नफा मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.


मिथुन - मिथुन राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखाद्या मोठ्या कामात यश मिळू शकते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Dev Diwali 2023 : देव दिवाळी कधी आहे? भगवान विष्णू, देवी लक्ष्मीला करा प्रसन्न! धन वृद्धीसाठी 'हे' विशेष काम करा, शुभ मुहूर्त पाहा