Ganeshotsav 2023 Health News : सण-उत्सवा दरम्यान मधुमेही रुग्णांना (Diabetic Patients) त्यांच्या आहाराबाबत खूप काळजी घ्यावी लागते. चुकूनही काही खाल्ल्यास रुग्णाची शरीरातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे मधुमेही रुग्णांच्या समस्या आणखी वाढतात. विशेषत: सणात या रुग्णांना खाण्याच्या बाबतीत विविध अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत ते काय खातात आणि काय नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागते. परिणामी, त्यांना मिठाई खाण्याची इच्छा मनातच दाबावी लागते. गणेशोत्सवामध्ये तुम्हालाही मिठाई खायची असेल तर तुम्ही शुगर फ्री मिठाई करून पाहू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका रेसिपीबद्दल सांगणार आहोत.
शुगर फ्री लाडू बनवण्यासाठी साहित्य
बदाम
मनुका
वेलची
काजू
नारळाचा किस
गूळ
राजगिऱ्याचे पीठ
रवा
असे बनवा शुगर फ्री लाडू
सर्व प्रथम एक कढई घेऊन त्यात तूप टाका, नंतर रवा आणि राजगीऱ्याचे पीठ भाजून त्यात थोडा गूळ घाला.
हे मिश्रण गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत भाजून घ्या.
हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात तूप टाका आणि मग त्यात ठेचलेला डिंक टाकून मिक्स करा.
आता या मिश्रणात ग्राईंड केले ड्राय फ्रूट्स मिक्स करून लाडू बनवा.
आता चविष्ट आणि शुगर फ्री लाडू तयार आहेत. हे लाडू खाऊनही तुम्ही गोड पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता.
शुगर फ्री लाडू एक चांगला पर्याय
मधुमेही रुग्णांसाठी साखरमुक्त लाडू हा एक पर्याय आहे. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. रक्तातील साखरेची पातळीही वाढत नाही. हे लाडू खाल्ल्याने रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलवर परिणाम होत नाही आणि ते असंतुलित होण्याचा धोकाही कमी असतो. शुगर फ्री लाडू खाल्ल्याने वजन वाढत नाही, म्हणजेच खाल्ल्यास लठ्ठपणा वाढेल म्हणून काळजी करू नका.
19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात
यंदा मंगळवार, 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या तारखेपासून 10 दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो, जो अनंत चतुर्दशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्दशीपर्यंत गणेश विसर्जनापर्यंत चालतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक गणपती बाप्पाला घरी आणतात, त्याची प्रतिष्ठापना करतात आणि पूजा करतात. भाविकांचा असा विश्वास आहे, बाप्पाच्या आगमनाने जीवनात सुख-समृद्धी येते आणि अडथळे दूर होतात.
गणेश चतुर्थी 2023 तारीख, पूजा वेळ आणि शुभ योग
पंचागानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 पासून सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1:43 पर्यंत चालेल. उदयतिथी लक्षात घेऊन 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : Weight Loss आणि Fat Loss मध्ये नेमका फरक काय? वजन कमी करण्याच्या 'या' 5 सामान्य चुका