Ganeshotsav 2023  : भगवान गणेशाला (Lord Ganesh) बुद्धीची देवता मानले जाते. गणेशजी हे रिद्धी सिद्धीचे स्वामी आहेत. हिंदू धर्मानुसार कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. गणेशोत्सव मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होत आहे. या दिवशी संपूर्ण देशात घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या भव्य आणि सुंदर मूर्तींची स्थापना केली जाते. भारतात गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदाच्या गणेशोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. हा उत्सव 10 दिवस साजरा केला जाणार आहे. गणपतीची पूजा करणाऱ्या भक्तांसाठी हे 10 दिवस खास आहेत. भगवान गणेशाच्या पूजेमध्ये मोदक, जास्वंदी आणि दुर्वा अर्पण करणे याला विशेष महत्त्व आहे. गणपतीच्या पूजेसाठी या गोष्टी का अर्पण केल्या जातात? त्यामागची कथा आणि नियम काय आहे? जाणून घेऊयात...



भगवान गणेशाला दुर्वा का प्रिय आहेत?
अशी मान्यता आहे की, दुर्वा अर्पण केल्याने जीवनातील सुख आणि संपत्ती वाढते. दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. 



पौराणिक कथा काय?
एका पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी अनलासुर नावाचा राक्षस होता, त्याच्या क्रोधामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवर कहर निर्माण झाला होता. अनलासुर हा एक राक्षस होता, जो ऋषीमुनींना आणि सामान्य लोकांना जिवंत गिळत असे. या राक्षसाच्या अत्याचाराला कंटाळून इंद्रासह सर्व देव, देवी, ऋषी-मुनी महादेवाची प्रार्थना करण्यासाठी गेले. या सर्वांनी महादेवाला अनलासुरच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा महादेवाने सर्व देव, देवी आणि ऋषींची प्रार्थना ऐकून त्यांना सांगितले की, केवळ श्री गणेशच अनलासुराचा नाश करू शकतात. सर्वांच्या सांगण्यावरून श्री गणेशाने अनलासुरला जिवंत गिळले, तेव्हा त्याच्या पोटात जळजळ होऊ लागली. या समस्येचा सामना करण्यासाठी विविध उपाय करूनही जेव्हा गणेशाच्या पोटातील जळजळ कमी होत नव्हती, तेव्हा कश्यप ऋषींनी दुर्वाच्या 21 जुड्या बनवून गणेशाला खायला दिल्या. गणेशाने या दुर्वा स्वीकारल्या आणि त्याच्या पोटातील जळजळ कमी झाली. तेव्हापासून श्री गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते.



गणपतीला दुर्वा अर्पण करण्याचे नियम


गणपतीला दुर्वा अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवा.
लक्षात ठेवा की दुर्वा मंदिरात, बागेत किंवा स्वच्छ ठिकाणी वाढवावी.
ज्या ठिकाणी घाण पाणी येते त्या ठिकाणाहून गणेशाला दुर्वा अर्पण करू नये.
नेहमी दुर्वाची जोडी बनवून देवाला पूजेत अर्पण करावी.
गणपतीला दुर्वाच्या 21 जोड्या अर्पण कराव्यात.
दुर्वा अर्पण करताना गणेशाच्या मंत्रांचा जप करावा.



दुर्वा अर्पण करताना या मंत्रांचा जप करा


ऊँ गं गणपतेय नम:
ऊँ गणाधिपाय नमः
ऊँ उमापुत्राय नमः
ऊँ विघ्ननाशनाय नमः
ऊँ विनायकाय नमः
ऊँ ईशपुत्राय नमः
ऊँ सर्वसिद्धिप्रदाय नम:
ऊँएकदन्ताय नमः
ऊँ इभवक्त्राय नमः
ऊँ मूषकवाहनाय नमः
ऊँ कुमारगुरवे नमः



श्रीगणेशाला पूजेत जास्वंदी आणि गुलाबाचा समावेश
ज्योतिषांच्या मते श्रीगणेशाला पूजेत अर्पण केलेले फूलही विशेष असते. गणपती बाप्पाला लाल फुले आवडतात. ज्यामध्ये प्रामुख्याने जास्वंदी आणि गुलाबाचा समावेश होतो. भक्तांनी गणेशाच्या पूजेत जास्वंदी आणि गुलाबाचा अर्पण केल्यास विशेष आशीर्वादाचा वर्षाव होतो.



गणेशपूजा जास्वंदीच्या फुलांचे महत्व
पौराणिक मान्यतेनुसार, हिंदू धर्मातील सर्व देवतांमध्ये गणेशाला विशेष स्थान आहे. गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही असे म्हणतात. म्हणूनच पूजेच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. असे म्हणतात की ज्या व्यक्तीवर गणेशाची कृपा असते, त्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. असे लोक नेहमी त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होतात आणि आनंदी जीवन जगतात. गणपतीला लाल रंग खूप आवडतो. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये लाल रंगाची फुले वापरावीत. गणेशाची पूजा करताना जास्वंदीच्या फुलांचा वापर करावा. त्यामुळे बाप्पा आणखीनच खुश होतो. आपल्या भक्तावर आशीर्वादाचा वर्षाव करतो. गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर निषिद्ध असल्याची माहिती आहे.



तुळशीने कधीही पूजा करू नका


ज्योतिषांच्या मते, यंदा गणेशाला फुले अर्पण करताना काळजी घ्यावी. पद्मपुराण आचाररत्नात असेही लिहिले आहे की 'न तुलस्य गणाधिपम' म्हणजे तुळशीने कधीही गणेशाची पूजा करू नका. श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे. गणेशाला दुर्वा अत्यंत प्रिय आहे. दुर्वाच्या वरच्या भागावर तीन-पाच पाने असतील तर खूप चांगले. श्री गणेशजींना लाल फुले खूप आवडतात. पूजेत लाल गुलाब अर्पण केल्याने आपल्याला पूर्ण आशीर्वाद मिळतो.



गणपतीला मोदक का प्रिय आहेत?
असे मानले जाते की जर कोणी गणपतीला मोदक अर्पण केले तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते. असेही मानले जाते की मोदक अर्पण केल्याने व्यक्तीला ऋणातूनही मुक्ती मिळते. याशिवाय बुंदीचे लाडू देखील गणेशाला अतिशय प्रिय आहेत. लाडू अर्पण केल्याने श्रीगणेश व्यक्तीला संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात.


 



पौराणिक कथा काय?
पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश आणि परशुराम यांच्यात युद्ध झाले होते. परशुरामाच्या हल्ल्यामुळे गणेशाचा एक दात तुटला. तुटलेल्या दातामुळे गणेशाला खूप वेदना झाल्या. वेदनेमुळे त्याला काहीही खाणे-पिणे शक्य होत नव्हते. यानंतर गणपतीसाठी काहीतरी बनवण्याची ऑर्डर देण्यात आली. जी तो आरामात खाऊ शकेल. मग मोदक बनवले, जे खाल्ल्यावर तो दुःख विसरला आणि खूप आनंदी झाला. तेव्हापासून गणेशजींना मोदक अतिशय प्रिय झाले.


 


देवी पार्वतीने समजावले मोदकाचे महत्त्व
याशिवाय मोदकाबाबत आणखी एक प्रचलित पौराणिक कथा आहे. एकदा देवांनी देवी पार्वतीला अमृतापासून तयार केलेला दिव्य मोदक दिला होता. मोदक पाहून भगवान कार्तिकेय आणि भगवान गणेश माता पार्वतीकडे विचारणा करू लागले. यानंतर आईने त्याला या मोदकाचे महत्त्व समजावून सांगितले. या मोदकच्या वासानेच अमरत्व प्राप्त होते, असे त्यांना सांगण्यात आले. जो खातो किंवा वास घेतो तो सर्व शास्त्रांचा जाणकार आणि सर्व कलांचा जाणकार होतो. यानंतर माता पार्वती म्हणाली की, तुम्हा दोघांपैकी जो धार्मिक आचरणातून श्रेष्ठता प्राप्त करून सर्व पवित्र स्थळांना प्रथम भेट देईल, त्याला मी हा मोदक देईन. आईचे हे शब्द ऐकून कार्तिकेयाने मोरावर आरूढ होऊन सर्व पवित्र ठिकाणी स्नान केले. येथे गणेशजींचे वाहन मुषक होते. त्यामुळे ते यात्रेला जाऊ शकले नाहीत. तेव्हा गणेशजी आपल्या आई-वडिलांभोवती प्रदक्षिणा घालून वडिलांजवळ येऊन उभे राहिले. हे पाहून माता पार्वतीने सांगितले की, सर्व तीर्थांमध्ये केलेले स्नान, सर्व यज्ञांचे अनुष्ठान, सर्व देवांना केलेले नमस्कार आणि सर्व प्रकारचे व्रत, मंत्र, योग आणि संयम यांचे पालन हे सर्व काही आईवडिलांच्या पूजेच्या समान आहेत. गणेशने चतुरपणा दाखवून महान असल्याचे दाखवून दिले आहे. म्हणून हा मोदक गणेशाला देण्यात आला.


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


 


संबंधित बातम्या


Ganeshotsav 2023: 'ही' आहेत भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिर; यंदा गणेश चतुर्थीनिमित्त देऊ शकता भेट