Merry Christmas 2024: सध्या भारतासह जगभरात ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सजावटही करण्यात आली आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसचा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. ख्रिसमस हा असाच एक खास सण आहे, जो ख्रिश्चन धर्मासह इतर धर्मातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आज आम्ही तुम्हाला दरवर्षी 25 डिसेंबरलाच ख्रिसमस डे का साजरा केला जातो आणि त्याच्या इतिहासाबद्दल सांगणार आहोत...


नाताळ 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो?


तुम्हाला माहितीय का? नाताळ 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो? 137 मध्ये रोमन बिशपने ख्रिसमसचा हा सण साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली होती. परंतु त्या वेळी या सणासाठी कोणताही निश्चित दिवस नव्हता, परंतु नोंदीनुसार, सम्राट कॉन्स्टंटाईनच्या काळात, रोममधील चर्चने 25 डिसेंबर 336 रोजी ख्रिसमस साजरा करण्यास सुरुवात केली. माहितीनुसार, 25 डिसेंबरच्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्यामुळे नाताळच्या दिवशी ख्रिश्चन लोक एकत्र येऊन प्रभु येशूची पूजा करतात. 


ख्रिसमस सणाचा इतिहास काय आहे?


ख्रिसमस सणाच्या इतिहासाबद्दल सांगायचे तर, हा सण येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून साजरा केला जात आहे, तर काही जण असं म्हणतात की, येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीही हा सण साजरा केला जात असे. हा सण सँक्चुलिया या रोमन सणाचे नवीन रूप आहे. सँक्चुलिया हा रोमन देव आहे असे म्हटले जाते. असे म्हणतात की, जेव्हा ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली तेव्हा लोकांनी येशूला आपला देव मानून हा सण 'ख्रिसमस डे' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.


ख्रिसमस सण कशाप्रकारे साजरा केला जातो?


ख्रिसमसच्या दिवशी येशू ख्रिस्ताची जयंती साजरी करण्यासाठी, चर्चमध्ये विशेष प्रार्थना केल्या जातात आणि विविध ठिकाणी प्रभु येशू ख्रिस्ताचे खास देखावे सादर केले जाते. या दिवशी लोक त्यांच्या घरात ख्रिसमस ट्री सजवतात. पार्टी करतात. केक बनवतात. 


हेही वाचा>>>


Christmas Cake Recipe: ख्रिसमसच्या दिवशी असेल प्रेमाचा गोडवा! घरीच बनवा 'हे' 3 प्रकारचे केक, पार्टीत होईल तुमचं खूप कौतुक


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )