Ayodhya Ram Mandir : अयोध्येत रामललाला त्यांच्या मंदिरात विराजमान करण्याची तयारी सुरू झाली आहे. आज 18 जानेवारी 2024 हा राम मंदिर विधींचा तिसरा दिवस आहे. 22 जानेवारीला रामनगरीच्या नव्याने बांधलेल्या मंदिरात रामललाच्या मूर्तीला अभिषेक केला जाईल, मात्र आज गर्भगृहात रामलला प्रवेश करणार आहे. यासोबतच आज राममंदिरात जलाधिवास-गंगाधीवास होणार आहे. काय आहे ही परंपरा? जाणून घ्या 



राममंदिरात आज होणार रामललाचा जलाधिवास-गांधीवास, जाणून घ्या काय आहे ही परंपरा


18 जानेवारी 2024 हा राम मंदिर विधींचा तिसरा दिवस आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. जाणून घ्या आज कोणते असेल रामललाचे अधिवास?


हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. अशात 18 जानेवारीला गणेश, अंबिका आणि तीर्थपूजन पहिल्या पाच दिवसांच्या विधीमध्ये करण्यात येणार आहे. 


18 जानेवारीला जलयात्राही निघणार आहे. यानंतर अधिवासाचे आयोजन केले जाईल. 


अधिवास ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मूर्ती ठराविक कालावधीसाठी वेगवेगळ्या सामग्रीमध्ये ठेवली जाते. 


या दरम्यान मूर्तीवरील कारागिराच्या अवजारांमुळे झालेल्या जखमा बऱ्या होतात, तसेच सर्व दोष नाहीसे होतात. असे म्हणतात. 


आज रामललाचा जलाधिवास असेल. जलाधिवास म्हणजे ज्या मूर्तीला अभिषेक करावयाचा आहे ती मूर्ती शास्त्रीय पद्धतीनुसार ठराविक वेळेपर्यंत पाण्यात ठेवली जाणार.


यानंतर सायंकाळच्या सुमारास गंगाधीवास होईल. यामध्ये श्रीरामाच्या मूर्तीवर सुवासिक द्रव्ये लावली जाणार आहेत.


19 जानेवारी 2024 रोजी अयोध्या राम मंदिरात औषधी, केसराधिवास, घृताधिवास आणि धनाधिवास होणार आहेत.


यामध्ये रामललाच्या मूर्तीवर औषधी, केशर, तूप आणि धान्य ठेवण्यात येणार आहे.


 


अधिवासाचे कार्यक्रम


16 जानेवारी: प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजा
17 जानेवारी: मूर्तीचा मंदिर प्रवेश
18 जानेवारी (संध्याकाळी): तीर्थयात्रा, जलयात्रा, जलाधिवास आणि गंधाधिवास.
19 जानेवारी (सकाळी): औषधीवास, केसराधिवास, घृताधिवास
19 जानेवारी (संध्याकाळी) : धनाधिवास
20 जानेवारी (सकाळी): शर्कराधिवास, फलाधिवास
20 जानेवारी (संध्याकाळी): पुष्पाधिवास
21 जानेवारी (सकाळी): मध्याधिवास
21 जानेवारी (संध्याकाळी): शय्याधिवास



 22 जानेवारी रोजी अभिषेक 


 22 जानेवारी रोजी अभिषेक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघ प्रमुख मोहन भागवत आणि ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या भाषणानंतर सर्व पाहुण्यांना एक-एक करून रामलल्लाचे दर्शन दिले जाईल. प्राण प्रतिष्ठामध्ये 50 देशांतील 53 प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. सर्व आध्यात्मिक-धार्मिक परंपरांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीलाच का होणार राम मंदिराचं उद्घाटन? या मागे आहे 'हे' धार्मिक कारण