Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येचा राजा श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघा काही तासांचा अवधी शिल्लक आहे. गेल्या 500 वर्षांपासून इतिहास असलेल्या लढ्याला यश आलं असून रामलल्लाची त्याच्या जन्मस्थानी प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. या 500 वर्षांचा इतिहास मोठा रंजक आहे. बाबराने मंदिर पाडून त्याठिकाणी मशिद बांधण्यापासून सुरू झालेली ही घटना आता 22 जानेवारी 2024 पर्यंत येऊन पोहोचली. काय आहे राम मंदिराच्या आतापर्यंतचा इतिहास त्यावर एक नजर टाकू, 


ब्रिटिश काळापासून वाद


1528- राम मंदिर पाडून मशिदीची उभारणी


1528- बाबरचा सरदार मिर बाकीनं मशीद उभारली


1528- 1731- दोन्ही समुदायांमध्ये 64 वेळा संघर्ष


1822- मशीद उभारल्याचा अहवाल फैजाबाद कोर्टाचा कर्मचारी हफीजुल्लानं इंग्रजांना पाठवला


1855- हनुमानगढी परिसरात दोन समुदायांमध्ये मोठा सशस्त्र संघर्ष


1859- संपूर्ण वास्तू इंग्रज सरकारच्या ताब्यात


1859- आतल्या भागात नमाज बाहेरच्या भागात प्रार्थना


1860- निहंग शिखांनी फडकवलेला झेंडा काढण्यासाठी कोर्टात मशिदीच्या खातिबचा अर्ज


1877- महंत बलदेव दास यांनी चरण पादुका ठेवल्याची मशिदीच्या मौलवींची तक्रार


1877- मौलवीच्या तक्रारीवर कारवाई करण्यास कोर्टाचा नकार


15 जानेवारी 1855- मंदिर बांधण्याची परवानगी न्यायालयाकडे पहिल्यांदा मागितली



15 जानेवारी 1885- महंत रघुबर दास यांची मंदिर बांधण्यासाठी याचिका


24 फेब्रुवारी 1885- राम मंदिराची याचिका फैजाबाद जिल्हा न्यायालयानं फेटाळली



24 फेब्रुवारी 1885- जवळ मशीद असल्यानं संघर्ष संभवतो असं कारण दिलं


17 मार्च 1886- महंत रघुबर दास यांच्याकडून जिल्हा न्यायाधीशांकडे याचिका


----------------------------


मंदिर असल्याचं कोर्टाला मान्य


17 मार्च 1886- मशिदीच्या ठिकाणी मंदिर होतं असं कोर्टाकडून मान्य


17 मार्च 1886- मात्र आता खूप उशीर झाला आहे, असं म्हणत
मंदिर उभारण्याची परवानगी नाकारली


20-21 नोव्हेंबर1912- गोहत्येवरून अयोध्येत पहिल्यांदा दंगल


1906 पासून अयोध्येत गोहत्येला बंदी होती


मार्च 1934- फैजाबादच्या शहाजानपूरमध्ये गोहत्येवरून दंगल


मार्च 1934- दंगलीत मशिदीची भिंत आणि गुंबज फोडलं. नंतर सरकारकडून दुरुस्ती


1934- मशीद बाबरनंच बांधली होती का?, याबाबत आयुक्तांकडून चौकशीला सुरुवात


20 फेब्रुवारी 1944- अधिकृत गॅझेटमध्ये चौकशीचा अहवाल प्रकाशित


22-23 डिसेंबर 1949- मशिदीत श्रीरामाची मूर्ती प्रकटली


22-23 डिसेंबर 1949- मूर्ती हिंदूंनी ठेवली, मौलवींचा आरोप


22-23 डिसेंबर 1949- दोन्ही पक्षांकडून केसेस दाखल


22-23 डिसेंबर 1949- संपूर्ण वास्तू सरकारकडून ताब्यात. मात्र नमाज आणि प्रार्थना सुरू


1950- हिंदू महासभा आणि दिगंबर आखाड्याचा वास्तूच्या मालकीचा दावा, न्यायालयात याचिका दाखल


1950 - मूर्ती हटवू नका, कोर्टाचा अंतरिम आदेश


26 एप्रिल 1955- हायकोर्टाकडून दिवाणी न्यायालयाचा निर्णय सील


हेडर- राम मंदिर आणि 'ती' ५०० वर्ष


सब हेडर- अयोध्या, राम मंदिर आणि कोर्टकज्जे


1959 - निर्मोही आखाड्याकडून याचिका, राम जन्मभूमीचे पालक असल्याचा दावा


1961- मशिदीत मूर्ती ठेवण्याविरोधात वक्फ बोर्डाची याचिका


29 ऑगस्ट 1964- मुंबईत विश्व हिंदू परिषदेची स्थापना


7-8 एप्रिल 1984- राम जन्मभूमी मुक्तियज्ञाची स्थापना, महंत अवैद्यनाथ अध्यक्ष


१ फेब्रुवारी 1986- मशिदीची कवाडं उघडण्याचे कोर्टाचे आदेश
हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी


3 फेब्रुवारी 1986- न्यायलयाच्या निकालाविरोधात याचिका


6 फेब्रुवारी 1986- बाबरी मशीद कृती समितीची स्थापना


जून 1989- मंदिर चळवळ पहिल्यांदाच भाजपच्या जाहीरनाम्यात


1 एप्रिल 1989- 30 सप्टेंबर रोजी शिलन्यासाची घोषणा


मे 1989- मंदिरासाठी 25 कोटी गोळा करणार, विहिंपची घोषणा


1989- मंदिर इतरत्र हलवण्याची हायकोर्टात याचिका


14 ऑगस्ट 1989- परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश


ऑक्टोबर-नोव्हेंबर 1989- देशभरातून साडेतीन लाख विटा अयोध्येत


9 नोव्हेंबर 1989- सिंहद्वार परिसरात शिलान्यास संपन्न


1 जानेवारी 1990- सर्वेक्षण समिती स्थापण्याचे कोर्टाचे आदेश


------------------------------


कारसेवा, रथयात्रा आणि अटक


फेब्रुवारी 1990- पुन्हा कारसेवा करण्याची मोठी घोषणा


जून 1990- 30 ऑक्टोबरपासून बांधकाम सुरू करणार अशी घोषणा


25 सप्टेंबर 1990- सोमनाथवरून अडवाणींची रथयात्रा सुरू


19 ऑक्टोबर 1990- वादातली जमीन ताब्यात घेण्याबाबत केंद्राचा अध्यादेश


23 ऑक्टोबर 1990- प्रचंड विरोधामुळे अध्यादेश मागे


23 ऑक्टोबर 1990- भाजप नेते लालकृष्ण अडवाणींना बिहारमध्ये अटक


30 ऑक्टोबर-2 नोव्हेंबर 1990 लाखो कारसेवक अयोध्येत दाखल
वादातील वास्तूवर भगवा फडकवला


7 नोव्हेंबर 1990- व्ही. पी. सिंग सरकार कोसळलं, चंद्रशेखर नवे पंतप्रधान


23 डिसेंबर 1990- विहिंप आणि बाबरी कृती समितीकडून सरकारकडे दस्तावेज सादर


21 जून 1991- काँग्रेसचे नरसिंह राव पंतप्रधानपदी आले


7-10 ऑक्टोबर 1991- अयोध्येतील 2.77 एकर भूखंड यूपी सरकारकडून संपादित


25 ऑक्टोबर 1991- त्या भूखंडावर बांधकाम करण्यास हायकोर्टाची मनाई


2 नोव्हेंबर 1991- वादातील वास्तूचं संरक्षण करू, कल्याण सिंहांचं आश्वासन


फेब्रुवारी 1992- विवादित वास्तूभोवती संरक्षण भिंतीचं काम सुरू


मार्च 1992- राज्य सरकारकडून 42 एकर जागा राम जन्मभूमी ट्रस्टकडे हस्तांतरित


------------------------


मंदिर, मशिदीवरून दंगलीच्या घटना


मार्च-मे 1992- संपादित जमिनीवरील सर्व बांधकामं पाडली


मे 1992- बांधकाम स्थगित करण्यास हायकोर्टाचा नकार


9 जुलै 1992- विहिंपकडून पुन्हा कारसेवा, काँक्रीटचा चबुतरा बांधण्यास सुरुवात


15 जुलै 1992- कारसेवा थांबवण्याचे हायकोर्टाचे विंहिपला आदेश
 
18 जुलै 1992- बांधकाम थांबवा, राष्ट्रीय एकात्मता परिषदेची यूपी सरकारला सूचना


23 जुलै 1992- कुठल्याही प्रकारचं बांधकाम नको, सुप्रीम कोर्टाचे आदेश


26 जुलै 1992- कोर्टाच्या आदेशानंतर विश्व हिंदू परिषदेने कारसेवा थांबवली


ऑगस्ट १९९२- पंतप्रधान कार्यालयात अयोध्या प्रकरणी विशेष विभाग स्थापन


ऑक्टोबर 1992- पीएमओच्या सूचनेवरून विहिंप, बाबरी कृती समितीत चर्चेला सुरुवात


30 ऑक्टोबर 1992- 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवेची पुन्हा घोषणा


23 नोव्हेंबर 1992- राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या बैठकीवर भाजपचा बहिष्कार


24 नोव्हेंबर 1992- केंद्रानं अयोध्येत राखीव दलाची तुकडी पाठवली


27-28 नोव्हेंबर 1992- विवादित वास्तूचं संरक्षण करू, यूपी सरकारचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र


6 डिसेंबर 1992- बाबरी मशीद पाडली, कारसेवकांविरोधात गुन्हा दाखल


6 डिसेंबर 1992- अडवाणी, जोशी, उमा भारतींसह अनेकांवर गुन्हा दाखल


6 डिसेंबर 1992- नंतर देशभरात अनेक ठिकाणी दंगली, सुमारे २ हजार जणांचा मृत्यू


10 डिसेंबर 1992- रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलावर केंद्र सरकारकडून बंदी


--------------------------------


आंदोलनं, सरकार, कोर्टातही लढा


15 डिसेंबर 1992- राजस्थान, हिमाचल, मध्य प्रदेशातील भाजपप्रणित सरकारं बरखास्त


16 डिसेंबर 1992- लालकृष्ण अडवाणींसह सहा जणांना अटक


27 डिसेंबर 1992- अयोध्येतील भूखंडाचा ताबा केंद्र सरकारकडे


7 जानेवारी 1993- अयोध्येतील 67.7 एकर भूखंड केंद्राकडून संपादित


27 फेब्रुवारी 1993- लालकृष्ण अंडवाणींविरोधात आरोपपत्र दाखल


12 मार्च 1993- मुंबईत साखळी बॉम्बस्फोट, अनेक लोकांचा बॉम्बस्फोटात मृत्यू


25 ऑगस्ट 1993- लालकृष्ण अडवाणी यांचा खटला सीबीआयकडे हस्तांतरित


8 सप्टेंबर 1993- अयोध्येबाबत लखनौमध्ये विशेष खंडपीठाची स्थापना


1998- केंद्रात भाजपचं सरकार, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी विराजमान


2002- 15 मार्च रोजी पुन्हा कारसेवा, विश्व हिंदू परिषदेची घोषणा


27 फेब्रुवारी 2002- गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेसचा डबा पेटवला,
58 कारसेवकांना जिवंत जाळलं


28 फेब्रुवारी 2002- गोध्रा प्रकरणानंतर गुजरातच्या अनेक भागांत दंगली


एप्रिल 2002- अलाहबाद हायकोर्टात सुनावणी सुरू


2003- अयोध्येत अवशेष सापडतायेत का बघा, हायकोर्टाचे पुरातत्व विभागाला आदेश


मे 2004- केंद्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता आली


जून 2009- लिबरहान आयोगाचा अहवाल संसदेत मांडला


2010- अलाहबाद हायकोर्टाचा निकाल, वादातील जमिनीचे तीन भाग करण्याचे आदेश


2010- निर्णयाविरोधात हिंदू महासभेची सुप्रीम कोर्टात धाव


मे 2011- जमिनीचं विभाजन करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून स्थगित


-----------------------------


अखेर राम मंदिर तिढा सुटला


मे 2014- देशात भाजपची बहुमताने सत्ता, नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी


2015- विश्व हिंदू परिषदेनं राजस्थानमधून विटा मागवल्या


मार्च 2017- योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले


21 मार्च 2017- अयोध्येबाबत कोर्टाबाहेर तोडगा काढा, सुप्रीम कोर्टाची सूचना


5 डिसेंबर 2017- सुनावणीचा वेग वाढवण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय


9 नोव्हेंबर 2019- सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल, वादातील जमीन रामलला विराजमान यांच्याकडे हस्तांतरित


25 मार्च 2020 रोजी 28 वर्षांनंतर श्रीरामच्या मूर्ती मंडपातून फायबर मंदिरात आणण्यात आल्या


5 ऑगस्ट 2020 रोजी मंदिराच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न


22 जानेवारी 2024- प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे लोकार्पण, शेकडो वर्षांचा वाद संपून रामनामाचा अखंड जप सुरू.



-------------------------


अशी आहे रामाची मूर्ती


मूर्तीत पाच वर्षाच्या मुलाची बालसुलभ कोमलता


प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण


पाणी प्रतिरोधक असल्याने हजारो वर्ष टिकणार


दुधाचा, पंचामृताच्या अभिषेकानेही परिणाम नाही


मूर्तीची चमक वर्षानुवर्ष कमी होणार नाही 


पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत 51 इंच उंची


मूर्तीचं वजन जवळपास 200 किलो इतकं आहे


डोक्यावर मुकूट आणि आभामंडल आहे


प्रभू श्रीरामाचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत.


भव्य कपाळ, तेजस्वी आणि मोठे डोळे


कमळाच्या फुलावर उभी असलेली मूर्ती


मूर्तीसोबत दगडापासून आकाराची चौकट


एका बाजूला गरूड, दुसऱ्या बाजूला हनुमान


ही मूर्ती एकाच दगडापासून कोरण्यात आली


प्रभू श्रीरामाची मूर्ती काळ्या रंगाची


-----------------------------


मूर्ती आणि अवतारांची कीर्ती


मूर्तीवर भगवान विष्णूचे दहा अवतार


मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंहाचा अवतार


मूर्तीवर वामन, परशुराम, राम,अवतार


कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांचे अवतार


-------------------------


काय आहेत मंदिरात इतर सुविधा?


श्रीराम कुंड - यज्ञशाळा


कर्मक्षेत्र - धार्मिक विधीची जागा


हनुमानगढी - हनुमानाची मूर्ती


राम जन्मभूमी- संग्रहालय


कम्म कीर्ती - सत्संग भवन


गुरू वशिष्ठ पीठिका - अध्ययन केंद्र


भक्ती टिला - ध्यानधारणा शांतता क्षेत्र


तुलसी - रामलीला केंद्र, खुलं सभागृह


राम दरबार - व्याख्यान, संवाद केंद्र


कौशल्या वात्सल्य मंडप - प्रदर्शन केंद्र


रमांगण - चित्रपटगृह


रामायण - एसी ग्रंथालय, वाचनालय


महर्षी वाल्मिकी - दस्तावेज संशोधन केंद्र


रामाश्रयम - भक्त निवास


श्री दशरथ - गोशाला


लक्ष्मण वाटिका - संगीत कारंज


लव-कुश निकुंज - लहान मुलांसाठी परिसर


मर्यादा खंड - पाहुण्यांसाठी कॉटेज, अपार्टमेंट


भरत प्रसाद मंडप - प्रसादासाठी कॅफेटेरिया


माता सीता रसोई अन्नकेंद्र - भव्य स्वयंपाक घर


---------------------


असा आहे ऐतिहासिक मंदिराचा भूगोल


एकूण परिसर- 2.7 एकर


चटईक्षेत्र- 57,400 चौरस फूट


मंदिराची लांबी-360  फूट


मंदिराची रुंदी- 235 फूट


कळसासह उंची- 161 फूट


एकूण मजले- 3


प्रत्येक मजल्याची उंची- 20 फूट


तळमजल्यावर खांब- 160


पहिल्या मजल्यावर खांब- 132


दुसऱ्या मजल्यावर खांब- 74


एकूण घुमट- 5


एकूण महाद्वार- 12


एकूण दरवाजे- 44


------------------


सहा मंडप वाढवणार मंदिराची शोभा


शिखर मंडप


गर्भगृह मंडप


कुदु मंडप


नृत्य मंडप


रंग मंडप


कीर्तन मंडप


---------------


मंदिरासाठी कुठून आणले दगड?


राजस्थानमधून खास दगड


बंसी पहाडपूरचे दगड


4.75 लाख क्युबिक फूट दगड


--------------


मंदिराची थोडक्यात संपूर्ण माहिती


बजेट- 1800 कोटी


आतापर्यंत खर्च- 900 कोटी


नागर शैलीत मंदिर


श्रीरामाची बालरुप मूर्ती


पहिला मजला- श्रीरामाचा दरबार


सिंहद्वारापासून 32 पायऱ्या


पूर्वेकडून मंदिर प्रवेश


4 बाजूंना आयताकृती तटबंदी


तटबंदीच्या कोनांना सूर्यदेव मंदिर


कोनांना आई भगवती, गणपती मंदिर


भगवान शिव यांना समर्पित मंदिरे


उत्तरेला अन्नपूर्णेचे मंदिर


दक्षिणेला हनुमानाचं मंदिर


मंदिराजवळ पौराणिक सीताकूप


दक्षिण-पश्चिम भागात जटायूची मूर्ती


लोखंडाचा वापर नाही


जमिनीवर काँक्रीटीकरणही नाही


14 मीटर जाडीचं कॉम्पॅक्टेड काँक्रीट


आरसीसीला कृत्रिम खडकाचे स्वरूप


ग्रॅनाईटचा 21 फूट उंच मंडप


अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था


स्वतंत्र पॉवर स्टेशन


25 हजार क्षमतेचे यात्रेकरू केंद्र


स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधणी


पर्यावरण-जलसंवर्धनाची काळजी


70 टक्के क्षेत्रावर हिरवळ


---------------------


मंदिरात भक्तांसाठी सुसज्ज यंत्रणा


बहुपयोगी वितरण कक्ष


बँकेसह एटीएमची सोय


स्वच्छतागृहांची सुविधा


अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा


दिव्यांग, वृद्धांसाठी रॅम्प, लिफ्ट


सोलर, जनरेटरची यंत्रणा


भक्त सुविधा केंद्र


प्रशासकीय कार्यालय


भक्तांसाठी व्यवस्थापन यंत्रणा


--------------------


संपूर्ण मंदिर, समृद्ध दर्शन


खांब, भिंतींवर देवतांच्या मूर्ती


सिंहद्वारापासून ३२ पायऱ्या


पूर्वेकडून मंदिर प्रवेश


दिव्यांग, वृद्धांसाठी रॅम्प, लिफ्ट


4 बाजूंना आयाताकृती तटबंदी


तटबंदीच्या कोनांना सूर्यदेव मंदिर


कोनांना आई भगवती, गणपती मंदिर


भगवान शिव यांना समर्पित मंदिरे


उत्तरेला अन्नपूर्णेचे मंदिर


दक्षिणेला हनुमानाचं मंदिर


मंदिराजवळ पौराणिक सीताकूप


दक्षिण-पश्चिम भागात जटायूची मूर्ती


लोखंडाचा वापर नाही


जमिनीवर काँक्रीटीकरणही नाही


14 मीटर जाडीचं कॉम्पॅक्टेड काँक्रीट


आरसीसीला कृत्रिम खडकाचे स्वरूप


ग्रॅनाईटचा २१ फूट उंच मंडप


अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था


स्वतंत्र पॉवर स्टेशन


25 हजार क्षमतेचे यात्रेकरू केंद्र


स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधणी


पर्यावरण-जलसंवर्धनाची काळजी


70 टक्के क्षेत्रावर हिरवळ


ही बातमी वाचा :