Ashadhi wari 2023 : अवघ्या महारष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठुराच्या पंढरीतला आषाढी एकादशीचा (Ashadi Ekadashi) सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ऊन, वारा , पाऊस या कशाची तमा न बाळगता वारकरी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावामध्ये पंढपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या वारी सोहळ्यातील सर्वात आनंदाचा आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा सोहळा म्हणजे रिंगण सोहळा. आळंदीमधून प्रस्थान केलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा आज खुडूस फाटा येथे पार पडला. तर देऊमधून मार्गक्रमण करत असलेल्या संत तुकाराम महारांच्या पालखीचा उभ्या रिंगणाचा सोहळा देखील आज पार पडला. 


संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पंढपूरच्या दिशेने मार्गक्रमण


संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे खुडूस येथे पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात  मानाच्या अश्वांनी दोन प्रदक्षिणा ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना घातल्या. ही रिंगण सोहळा पार पडताच मानाच्या शवांच्या टापा खालची माती उचलण्यासाठी वारकऱ्यांची एकच गर्दी यावेळी पाहायला मिळाली. तर आता रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखीने आता वेळापूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. तर वेळापूर येथे संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. 


संत तुकाराम महारांज्या पालखीचे देखील प्रस्थान


संत तुकाराम महारांजी पालखी अकलुज वरुन निघाल्यानंतर माळीनगर येथे सकाळी पालखीचे पहिले उभे रिंगण पार पडले. तर उभे रिंगण पार पडल्यानंतर पालखीने बोरगावच्या दिशेने प्रस्थान केले. दरम्यान संत तुकाराम महाराजांची पालखी आज बोरगाव येथे मुक्काम करणार आहे. 


विठुरायाच्या पंढरीत सध्या वैष्णवांचा मेळा आता जमला असून अवघा आनंदाचा सोहळा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीहरिचा गजरात आणि टाळ मृदुगांच्या साथीने लोखो वारकऱ्यांनी पंढपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. चंद्रभागेच्या तिरावर विठुरायाच्या फक्त कळसाचे दर्शन घेऊन हे वारकरी समाधानाने माघारी फिरतात. अनेक राजकीय नेत्यांनी देखील पालखी सोहळ्यात सहभागी होऊन या पालखी सोहळ्याचा आनंद घेतला. अगदी काही दिवसांमध्येच या दोन्ही पालख्या पंढपुरात दाखल होतील. 


त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे विठ्ठलाची शासकीय पूजा पार पडेल. दरम्यान यावेळेस आषाढी एकादशीच्या दिवशी व्हीयाआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला आहे. तर अवघं पंढपूर देखील हरिनामाच्या गजरात तल्लीन झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ashadhi wari 2023 : विठुरायानं गाऱ्हाणं ऐकलं, वारी सफल झाली; पावसाला सुरुवात झाल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद