Ashadhi Wari 2023 : बंधू श्री संत सोपानकाका महाराजांचा पालखीचे (Sant Sopankaka Maharaj Palkhi) आज प्रस्थान झाले. दुपारी 1 वाजता सासवड येथील मंदिरातून म्हणजेच देऊळ वाड्यातून पालखी बाहेर पडली. 14 दिवस प्रवास करुन हा सोहळा 28 जूनला पंढरपूरमध्ये (Pandharpur) पोहोचेल. मंदिरात काही काळ भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर संत सोपानकाकांच्या चल पादुका असलेली पालखी उत्तर दरवाजातून बाहेर पडली. ज्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा हा सासवडमध्ये दाखल होतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होते. 


आज हजारो भाविकांनी ज्ञानबा तुकारामचा जागर करत हा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. सासवड शहरातून वाजत गाजत मिरवणुकीने हा सोहळा आता पुरंदर तालुक्यातील पांगरे या ठिकाणी पहिला मुक्काम असणार आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज सोपान काका महाराजांच्या पालखी प्रस्थनाला हजेरी लावली आणि दर्शन घेतलं. 


संत सोपानकाका यांच्या पालखीचा मार्ग कोणता आहे?


संत सोपानकाका यांची पालखी सासवड, पांगारे, मांडकी. निंबुत, कोऱ्हाळे बु. बारामती, लासुर्णे, निरवांगी, अकलूज, भंडी शेगाव, वाखरी मार्गे ही पालखी पंढरपूरला जाते. तसेच संत चांगावटेश्वर पालखी अनुक्रमे सासवड, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव, वाघापूर, शिंदवने, मार्गे बोरीऐदी, तद्नंतर संत तुकाराम महाराज पालखी मार्गे जात असते. सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि भाविक भक्तिभावाने सामील झाले होते. टाळ, मृदुंगाचा गजर आणि विठु नामाने अवघा परिसर दुमदुमून निघाला होता. खांद्यावर भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन, विठ्ठल रखुमाईची मूर्ती डोक्यावर घेऊन एका रांगेत निघालेले वारकरी हे चित्र अगदी मनमोहक दिसत होतं.


एक लाख वारकरी उपस्थित...


वै.ह.भ.प धोंडोपंत दादा महाराज यांच्या निर्वाणानंतर त्यांचेच शिष्य असणाऱ्या वै.ह.भ.प भगवान महाराज शिवणीकर यांनी हा सोहळा चालवला. तर आता भगवान महाराजांचे वंशज ह.भ.प माधव महाराज शिवणीकर हे या सोहळ्यास चालवण्यास सहकार्य करतात. तर सध्या वै. ज्ञानेश्वर महाराज गोसावी यांचे नातु ह.भ.प गोपाळ महाराज गोसावी हे हा पालखी सोहळा चालवतात. हा पालखी सोहळा सासवड-मोरगांव-अकलुज-वाखरी या मार्गे पंढरीत दाखल होतो. आताच्या काळात जवळपास एक लाख वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.


संबंधित बातमी-


Ashadhi Wari 2023 : मालिशमुळे वारकरी सुखावले... दिवेघाटात चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एका क्षणात हसू