Marriage Relationship Tips : आपण पाहतो... नवीन लग्न झालं की जो येईल तो सल्ला देतो. काही चांगले असतात तर काही स्वार्थी, मानसशास्त्रज्ञ सांगतात की, चांगल्या नात्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेली सकारात्मकता, जी तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतेच पण तुम्हाला आनंदी ठेवते. जर असे होत नसेल तर याचा अर्थ तुमचं नातं कुठेतरी तुटण्याची चिन्हे आहेत. जे हितचिंतक असतात ते कधीही नातं तुटण्यापासून कसं वाचवता येईल हे पाहतात. मात्र काही नातेवाइकांकडून असे अनेक सल्ले दिले जातात, जे नातेसंबंध वाढण्याऐवजी तुटण्याच्या मार्गावर आणतात. नातेवाईकांचे असे काही सल्ले आहेत जे तुमचे नाते बिघडू शकतात आणि तुमच्या पतीसोबतचे नाते चांगले होण्याऐवजी खराब होऊ शकते. जाणून घ्या कोणते सल्ले आहेत ते?


 


वेळेनुसार सर्व काही ठीक होईल


नातेवाइकांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करून तुम्ही नात्यात वाट बसू शकत नाही की वेळेनुसार सर्वकाही चांगले होईल, कारण कधी कधी वेळ निघून जाते आणि नातेसंबंध बिघडत राहतात. म्हणूनच, जेव्हा तुमच्या नात्यात थोडीशी कटुता असते तेव्हा तुम्ही तुमच्यातील गोष्टी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.



सासरचे घर सोडण्याचा सल्ला


पती-पत्नीमधील परस्पर संबंध बिघडले की सासरचे घर सोडावे असा काही नातेवाईकांचा विशेष सल्ला असतो. त्यांच्या मते, सासरपासून वेगळे राहिल्याने सर्व काही चांगले होते. पण जर तुम्हाला तुमचं नातं अबाधित ठेवायचं असेल तर नातेवाईकांचा हा सल्ला मानू नका.



बेबी प्लॅनिंग करा


जेव्हा नातेवाईक तुमच्या बिघडत चाललेल्या नात्याबद्दल ऐकतात, तेव्हा त्यांचा पहिला सल्ला असतो की आता बेबी प्लॅनिंग करा, सर्वकाही ठीक होईल. बेबी प्लॅनिंग करण्यापूर्वी आपले नातेसंबंध दुरुस्त करणे कसे चांगले होईल हे पाहावे. मुलाला जन्म देण्याचा निर्णय तुमच्या दोघांचा असावा, तुमच्या नातेवाईकांचा नाही.


 


घरकाम फक्त स्त्रियांना शोभते


घरातील बहुतांश कामे ही स्त्री करते. पण जर तुम्ही तुमच्या पतीला तुमच्या नातेवाईकांसमोर छोट्या-छोट्या कामातही मदत करायला सांगितली तर तो अनेकदा तुम्हाला टोमणा मारेल की घरातील काम पुरुषांसाठी नाही आणि नातेवाईकही तेच म्हणतील. नातेवाईकांनी मारलेल्या टोमण्यामुळे नवऱ्याच्या वागण्यातही बदल होतो. अशा परिस्थितीत त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे.


 


स्वाभिमानाची बाब असेल तर झुकू नका


तुमच्या नातेवाइकांना तुमचे परस्पर मतभेद कळताच अनेक सल्लागार तुम्हाला सल्ला देतील की तुमचा स्वाभिमान असेल तर हार मानू नका. अशा सल्ल्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, कारण अशा सल्ल्याने तुमचे चांगले नातेही बिघडू शकते. नातं टिकवण्यासाठी कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं.


 


मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा..


एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीनुसार राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. एस. धनंजय म्हणतात, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांमध्ये पुरेसे प्रेम मिळत नाही, तर आधी कारणं जाणून घ्या. तुम्ही तुमच्या सासरच्या मंडळींना आई-वडिलांप्रमाणे, वहिनींना बहिणीप्रमाणे, दीराला भावाप्रमाणे वागवून त्यांचा आदर करता का? तुमच्या सासरच्या घरात कोणी तुमच्याशी कसे वागते हे त्याचे व्यक्तिमत्त्व दर्शवते. तुम्ही जगातील प्रत्येकाला संतुष्ट करू शकत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणाचाही अपमान करू नका. तुमच्यासोबत काही अप्रिय वर्तन घडल्यास एकांतात चर्चा करा आणि शांतपणे तुमच्या पतीला सांगा. एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्या सासरच्या लोकांशी आणि पालकांशी नक्कीच चर्चा करा आणि जर काही पटले नाही तर मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्या.


 


टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. 


हेही वाचा>>>


Relationship Tips : 'काही' गोष्टींना 'नाही' म्हणायलाही शिका! असं केलंत तर निभावेल' अन्यथा तुमचा चांगुलपणाच ठरेल नुकसानाचं कारण