Relationship: महिला अनेकदा आपल्या मनातील गोष्टी सांगताना विचार करतात. तर काही जणी मनातल्या गोष्टी मनातच ठेवतात. त्यांच्या मनात जर एखाद्याविषयी प्रेम असेल तर त्या काही महिला भीतीपोटी किंवा लाजेमुळे स्वत:हून त्या पुरूषाला कधीच सांगत नाही. पण तुम्हाला माहितीय का? महिला कोणत्या प्रकारच्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात? त्यांना कोणत्या प्रकारच्या पुरुषाशी लग्न करायचे आहे? तसेच कोणत्या प्रकारच्या पुरुषासोबत डेटवर जायचे आहे? हे असे काही प्रश्न आहेत, ज्यावर नेहमीच वाद होतात. मात्र एका संशोधनातून माहिती समोर आली आहे. जी समजताच तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही... जाणून घ्या...


महिला कोणत्या पुरुषाकडे आकर्षित होतात? एका संशोधनातून खुलासा


महिलांचे पुरुषांबाबत असेच काही प्रश्न एका संशोधनात डीकोड करण्यात आले आहेत. या संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांना शारीरिकदृष्ट्या मजबूत पुरुष आवडतात. त्याच वेळी, जेव्हा विवाह आणि दीर्घकालीन नातेसंबंध येतो तेव्हा स्त्रिया सामान्यतः आनंदी-आर्थिक स्थैर्य असलेला पुरुष निवडण्यास प्राधान्य देतात. संशोधनानुसार, स्त्रिया ताकदवान आणि आनंदी पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, ती काही बाबी लक्षात घेऊन एखादी महिला तिचा जोडीदार निवडते. अल्पकालीन नातेसंबंधांसाठी स्त्रिया शक्तिशाली पुरुषांना प्राधान्य देतात, दीर्घकालीन संबंधांसाठी आर्थिक स्थैर्य, चांगली नोकरी, घरदार असलेल्या पुरूषांना प्राधान्य देतात.


संशोधनात काय म्हटलंय?


संशोधन डेटा आपल्याला दर्शवितो की, शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्मसाठी जोडीदारांसाठी भिन्न-भिन्न प्राधान्ये दिली जातात, लॉंग टर्म रिलेशनसाठी पुरुषांची शारीरिक वैशिष्ट्ये आणि आर्थिक बाबी यांना वेगळे महत्त्व देतात. या संशोधनात हेट्रोसेक्सुअल और बाइसेक्सुअल असलेल्या अनेक महिलांनी भाग घेतला होता. यामध्ये 394 महिलांना प्रश्नोत्तरे विचारण्यात आली. यातील बहुतांश महिलांचे वय 19 वर्षांच्या आसपास होते. शारिरीक संबंधासाठी पुरुषांची ताकद आणि मानसिक गुण असलेल्या जोडीदाराची गरज या संदर्भातही महिलांनी आपली मते मांडली आहेत. महिलांचे म्हणणे आहे की, असा जोडीदार निवडावा जो शारीरिकदृष्ट्या आकर्षक असेल आणि त्याच्यात सकारात्मक वर्तन गुण असतील. शारीरिक ताकद आणि ह्यूमरबाबत महिलांची वेगवेगळी मते होती आणि संशोधनात सहभागी महिलांनीही आपले विविध मते मांडली, यात पुरुषांच्या बाबतीत महिलांची पसंती वेगळी दिसली.


हेही वाचा>>>


Relationship: रिलेशनशिपमध्ये नवा ट्रेंड 'सिमर डेटिंग'! तरुणांमध्ये होतोय लोकप्रिय, नात्यासाठी एक सुरक्षित मार्ग? काय आहे हा डेटिंगचा प्रकार?


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )