Passport Colours : परदेशात जाणं म्हटलं की पहिली गोष्ट लक्षात येते ते म्हणजे पासपोर्ट (Passport). त्यानंतर व्हिसा (Visa) महत्त्वाचा असतो. कोणत्याही नागरिकाला परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचा असतो. प्रत्येक देशाचा पासपोर्ट हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ज्यामुळे तेथील नागरिकांची सहज ओळख होऊ शकते. मात्र, तुम्हाला माहित हे का, की भारताचा पासपोर्ट हा एक नसून अनेक रंगांचा असतो. प्रत्येक रंगाच्या पासपोर्टचा वेगळा विशेष असा अर्थ असतो. आज आम्ही तुम्हाला पासपोर्टच्याच काही खास गोष्टी सांगणार आहोत. वेगवेगळ्या रंगांच्या पासपोर्टचा नेमका अर्थ काय ते जाणून घ्या. 


भारतीय पासपोर्टचे रंग कोणते? 


भारतीय पासपोर्ट तीन वेगवेगळ्या रंगांचा असतो. नागरिकांच्या सामाजिक स्तरानुसार या पासपोर्टचा खरा उद्देशही वेगळा आहे. जाणून घ्या निळ्या, पांढर्‍या आणि मरून पासपोर्टबद्दल काही खास रंजक गोष्टी.
 
निळ्या रंगाचा पासपोर्ट (Blue Colour Passport) :


निळ्या रंगाचा पासपोर्ट देशातील सर्वसामान्यांसाठी बनवण्यात आला आहे. या पासपोर्टमध्ये पासपोर्टमधील व्यक्तीच्या नावाव्यतिरिक्त त्या व्यक्तीची जन्मतारीख आणि स्थानिक पत्त्याची माहिती दिली जाते. याबरोबरच ओळखीसाठी फोटो, सही, शरीरावरील कोणतीही खूण याची माहितीही देण्यात आली आहे. पासपोर्टवर एखाद्या देशाचा व्हिसा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सहज प्रवास करता येतो.


पांढरा पासपोर्ट (White Colour Passport) :


काही अधिकृत कामासाठी परदेशात जाणाऱ्या अधिकृत व्यक्तीला पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो. ज्या लोकांना हा पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो त्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारी व्यक्तीला काही विशेष वागणूक दिली जाते. पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट असलेल्या व्यक्तीलाही काही विशेष सुविधा मिळतात.


मरून रंगाचा पासपोर्ट (Maroon Colour Passport) :


मरून रंगाचे पासपोर्ट फक्त भारतातील मुत्सद्दी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच दिले जाऊ शकतात. यामध्ये आयएएस आणि वरिष्ठ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ज्या लोकांकडे हा पासपोर्ट आहे त्यांना परदेशात जाण्यासाठी व्हिसा घेण्याचीही गरज नाही. तसेच, त्यांची इमिग्रेशन प्रक्रिया देखील इतरांच्या तुलनेत खूप सोपी आणि जलद होते. परदेशात गेल्यानंतर अशा व्यक्तीवर सहजासहजी गुन्हा दाखल करता येत नाही.


महत्त्वाच्या बातम्या : 


Slowest Train in India : 'ही' भारतातील सर्वात स्लो ट्रेन आहे; 5 तासांत फक्त 46 किलोमीटरचे अंतर पार करते