Slowest Train in India : भारतीय रेल्वेला भारतात फार महत्त्वाचं स्थान आहे. देशाच्या एका भागापासून दुस-या भागाशी जोडण्यासाठी रेल्वेचा सर्वाधिक वापर केला जातो. भारतात अनेक ट्रेन एकापेक्षा जास्त वेगाने धावतात. देशात लवकरच बुलेट ट्रेनही धावायला सुरुवात होणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या देशात अशीही एक ट्रेन आहे, ज्या ट्रेनला भारतातील सर्वात स्लो ट्रेनचा दर्जा देण्यात आला आहे. ही ट्रेन एका तासात 10 किलोमीटरचे अंतर कापते. तर, पाच तासांत ते 46 किलोमीटरचे अंतर कापते.
ही ट्रेन इतक्या कमी वेगाने का धावते?
देशातील सर्वात स्लो ट्रेनचे नाव 'मेट्टुपालयम उटी नीलगिरी पॅसेंजर ट्रेन' असे आहे. ही ट्रेन जेव्हा पर्वत रांगांतून प्रवास करते तेव्हा ती 326 मीटर उंचीवरून 2203 मीटर उंचीपर्यंत प्रवास करते. निलगिरी माउंटन रेल्वे अंतर्गत येणारी ही ट्रेन 5 तासांत 46 किलोमीटर अंतर कापते. या प्रवासादरम्यान ही ट्रेन वाटेत येणाऱ्या सुंदर नैसर्गिक ठिकाणांहून जाते. या ट्रेनमध्ये प्रवास करणारे लोक या सुंदर नैसर्गिक ठिकाणांचा आनंद घेण्यासाठी बसतात. निलगिरी माउंटन रेल्वेचे बांधकाम 1891 मध्ये सुरू झाले आणि ते 17 वर्षांत पूर्ण झाले.
या ट्रेनमध्ये तुम्हाला सुविधा कशा मिळतात?
देशातील या सर्वात स्लो ट्रेनमध्ये उपलब्ध सुविधांबद्दल सांगायचे झाल्यास, ही ट्रेन पूर्णपणे प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या सुविधांनी सुसज्ज आहे. ही ट्रेन वेलिंग्टन, कुन्नूर, केटी, लव्हडेल आणि अरवांकाडू स्टेशनमधून जाते. या 46 किलोमीटरच्या प्रवासात तुम्हाला 100 हून अधिक पूल आणि अनेक छोटे-मोठे बोगदे पार करावे लागतात. मेट्टुपालयम आणि कुन्नूरमधला रस्ता सर्वात सुंदर आहे. हे इतके सुंदर आहे की 2005 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
ही ट्रेन कधी धावते आणि तिकीट कसे काढायचे?
ही ट्रेन मेट्टुपालयम ते उटी रेल्वे स्थानकादरम्यान दररोज धावते. मेट्टुपालयम स्टेशनवरून सकाळी 7:10 वाजता सुटते आणि दुपारी 12 च्या सुमारास ऊटीला पोहोचते. यानंतर, ती उटीहून दुपारी 2 वाजता सुटते आणि 5:30 वाजता मेट्टुपालयम स्थानकावर परत येते. या ट्रेनमध्ये तुम्हाला प्रथम श्रेणीच्या तिकिटासाठी 545 रुपये आणि द्वितीय श्रेणीच्या तिकिटासाठी 270 रुपये मोजावे लागतील.
महत्वाच्या बातम्या :