Rakshabandhan Fashion : यंदाचा रक्षाबंधन खास असणार आहे. हा सण भाऊ-बहिणींसाठी खूप खास असतो. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा होतो, जेव्हा कुटुंबातील लोक एकत्र येतात आणि हा दिवस साजरा करतात. या वर्षी रक्षाबंधन हा सण 19 ऑगस्ट रोजी येत आहे. हा दिवस खास असल्याने या दिवशीचा लूकही तितकाच खास असायला हवा. त्यामुळे या दिवशी कोणते कपडे घालावे? असा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर आज आम्ही तुम्हाला इंडो वेस्टर्न आउटफिट बाबत सांगणार आहोत. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी भारतीय संस्कृतीला आधुनिकतेची जोड द्या, हे कपडे घातल्यानंतर तुम्ही सुंदर दिसाल आणि सर्वांकडून कौतुक होईल..



इंडो वेस्टर्न आउटफिट स्टाईल करू शकता


रक्षाबंधन या सणाला बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. हा सण जवळ येताच प्रत्येक वेळी फक्त एकच गोष्ट मनात राहते की, कोणत्या प्रकारचे आउटफिट स्टाईल करावे? जेणेकरून लूक चांगला दिसेल. यावेळी रक्षाबंधनात तुम्ही इंडो वेस्टर्न आउटफिट स्टाईल करू शकता. यामध्ये तुम्ही चांगले दिसाल. याशिवाय वेगवेगळे पॅटर्नही ट्राय करू शकाल.




फॉइल प्रिंट पेप्लम टॉप


जर तुम्हाला काही नवीन ट्राय करायचे असेल तर तुम्ही यासाठी पेप्लम टॉप स्टाइल करू शकता. हे तुम्हाला उत्तम लूक देईल. याशिवाय, तुम्हाला यामध्ये प्रिंटेड डिझाईन्सही मिळू शकतात. यामुळे तुमचा लुक वेगळा दिसेल. या प्रकारच्या पेप्लमसोबत तुम्ही बेल्ट किंवा ज्वेलरी घालू शकता. ज्यामुळे तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी सुंदर दिसू शकता. असे पेप्लम टॉप्स तुम्हाला 500 ते 1000 रुपयांना बाजारात किंवा ऑनलाईन मिळतील.





जॅकेट टॉप पॅंट सेट



रक्षाबंधनाला तुम्ही जॅकेट टॉप पँट सेट करू शकता. यामध्येही तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल. यामध्ये तुम्ही प्रिंटेड तसेच प्लेन डिझाइनमध्ये जॅकेट टॉप पँट सेट करू शकता. यामध्ये तुम्ही प्रिंटेड जॅकेट सोबत घालू शकता. असे सेट तुम्हाला 250 ते 500 रुपयांना बाजारात मिळतील. याशिवाय तुम्ही ॲक्सेसरीज जोडू शकता.




जंपसूट घाला


रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्ही जंपसूटही घालू शकता. यामुळे तुमचा लुकही चांगला होईल. यामध्ये तुम्ही प्लेन डिझाईन तसेच प्रिंटेड डिझाईनमध्ये चांगले दिसाल. यामध्ये तुम्हाला हवे असल्यास फुल स्लीव्हजसोबत कट स्लीव्हजचे डिझाईन ट्राय करू शकता. या प्रकारचे जंपसूट तुम्ही बाजारात 250 ते 500 रुपयांना विकत घेऊ शकता.


 


लहानांपासून मोठेही आऊटफिट ट्राय करू शकता


यावेळी रक्षाबंधनाच्या निमित्ताने लहानांपासून मोठेही इंडो वेस्टर्न आउटफिट स्टाईल करू शकतात. यामध्ये तुमचा लुक चांगला दिसेल. याशिवाय तुम्हाला काहीतरी नवीन ट्राय बघितल्याचा आनंद मिळेल. याच्या मदतीने तुम्ही नवीन खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे घालू शकता.


 


 


ही वाचा>>>


 


Raskhabandhan Fashion : रक्षाबंधनाच्या दिवशी दिसा हटके अन् सुंदर! अभिनेत्रींच्या ड्रेसवरून घ्या आयडिया, सगळेच म्हणतील..अतिसुंदर!


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )