Women Health: स्तनाचा कर्करोग हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्या कोणत्याही इतर रोगापेक्षा सर्वात गंभीर आहे. बहुतांश चाळीशीनंतर जडणारा हा आजार वयाच्या विशीत होऊ लागल्याचे समोर येऊ लागले आहे. स्तनपान करणाऱ्या स्त्रीयांसह रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये या कर्करोगाचं प्रमाण सर्वाधिक आहे. ९ महिलांपैकी एका स्त्रीला स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण असल्याचं तज्ञ सांगतात.
बहुतांश वेळेला हा कर्करोग झाल्याचंच महिलेला कळत नाही. जेंव्हा कळतं तेंव्हा खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे स्तनाचा आकार बदलणं, स्तनात गाठ तयार होणं, स्नायूंच्या वेदना अशा अनेक लक्षणांना सामोरं जावं लागतं. अनेकींना स्तन काढून टाकण्याची नामुष्की ओढावते.
स्तनाचा कर्करोग कशामुळे होतो?
- स्तनाच्या कर्करोगाला कौटुंबिक इतिहास असतो. कुटुंबातील आई, बहिणीमध्ये जर स्तन कॅन्सरच्या विषाणूंना सकारात्मक वातावरण असेल तर पुढच्या पिढीला हा कर्करोग होण्याची शक्यता असते. अशावेळी कुटुंबातील व्यक्तींमध्ये जर स्तन कॅन्सरची लक्षणे जाणवल्यास खबरदारी म्हणून स्वतः देखिल स्तन परिक्षण करुन घेणे आवश्यक असते.
- वयाच्या तिशीनंतर आपत्य झाल्यास या स्तनाच्या कर्करोगाचा धोका बळावतो. तसेच कुटुंबनियोजनाच्या अतिरेकामुळेही हा कर्करोग हाऊ शकतो.
- रजोनिवृत्तीनंतर तसेच निसंतती, वंधत्वाची समस्या असल्याच तसेच आपल्या बाळास स्तनपान न करणाऱ्या महिलांना हा कॅन्सर होण्याची शक्यता बळावते.
- लठ्ठपणा असणाऱ्या महिलांमध्येही स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढताना दिसतंय. अधिक चरबीयुक्त आहाराचे सेवन करणाऱ्या स्त्रीयांमध्ये तसेच व्यसनाधिनतेमुळे हा कर्करोग बळावतो.
काय आहेत लक्षणे?
- स्तनाचा कर्करोगाची सुरुवात दुग्ध ग्रंथीतून निघणाऱ्या वाहिकांमधून होते. सुरुवातीला स्तनाच्या ठिकाणी गाठी तयार होतात. पिन्ड तयार होते.
- अचानक स्तनाचा आकार वाढणे व स्तन घट्ट होणे, स्तन आकुंचन पावणे.
- बोंडातून द्राव येणे, आत वळलेले बोंड. बोंड लाल होऊन वेदना होणे.
- स्नायूंच्या वेदना, पाठ दुखी, दुर्बलता ही लक्षणे स्तनाच्या कँसरमध्ये जाणवू शकतात.
सध्या सोशल मिडीयावर ब्रेस्ट कॅन्सरविषयीची ही पोस्ट ट्रेंड होत असून यातूनही काय काळजी घ्यायची हे कळू शकेल.
स्तन कर्करोगाचे निदान करण्यासाठी काही वैद्यकीय चाचण्या करून घेणं अतिशय गरजेचं आहे. काेणत्या वैद्यकीय चाचण्या करता येतील?
मैमोग्राफी टेस्ट (Mammography)
स्तन कॅन्सरचे निदान करण्यासाठी मैमोग्राफीद्वारे स्क्रीनिंग परिक्षण केलं जातं. क्ष-किरण परिक्षणासारखेच मैमोग्राफीचे चाचणी असून 30 मिनिटामध्ये टेस्ट पूर्ण होते. तसेच चाचणीवेळी कोणताही त्रास होत नाही. या चाचणीतून उपस्थित गाठ ही कॅन्सरची आहे की नाही याचे निदान होण्यास मदत होते. यासाठी वेळोवेळी स्तनामध्ये गाठ झाली नसल्याची खात्री करणं गरजेचं आहे. ३५ वर्षांवरील स्त्रीयांमध्ये मेमोग्राफी करणं आवश्यक आहे. मात्र, अनेकजणी पुरेशा माहिती अभावी अभावी ही चाचणी करणे टाळतात.
ब्रेस्ट सेल्फ एक्झाम
स्वतःद्वारा स्तन परिक्षण करुन स्तनांच्या ठिकाणी गाठ किंवा असमान्य वृद्धी नसल्याची खात्री करुन घेणे गरजेचे आहे. तुम्ही स्वतःच्या स्तनांना स्पर्श करून गाठी किंवा अनियमित बदलांबद्दल माहिती करून घेऊ शकता. याकरिता विविध स्थितींमध्ये झोपून, उभे राहून आरशात हे बदल तुम्ही पाहू शकता. ब्रेस्ट सेल्फ एक्झामसंबंधी मार्गदर्शनासाठी आपल्या स्त्रीरोग तज्ञांशी संपर्क साधावा.
हेही वाचा: