Personality Development Tips : आजचा काळ करिअर, यश आणि वैयक्तिक विकासासाठी खूप बदलला आहे. तुम्ही कसे बसता, बोलता, अगदी तुम्ही कसे चालता यावरून व्यक्तिमत्त्वाचे परीक्षण केले जाते. एक काळ असा होता जेव्हा लोक मोठ्या प्रमाणात पोशाख लक्षात घेऊन इतरांचे व्यक्तिमत्व ठरवायचे. हा ट्रेंड आजही चालू आहे पण सध्या त्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. आता लोकांच्या व्यक्तिमत्त्वातून एक नाही तर अनेक छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात. आपण काही सवयी अंगीकारतो ज्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात लक्षात येतात. येथे आम्ही तुम्हाला छोट्या सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही ठरवू शकतात. या आधारे तुम्ही कसे आहात हे लोकांना कळते. 


चालताना आवाज करणे


भारतातील बहुतेक लोक चालताना चप्पल किंवा बूट घालून आवाज करतात. ही एक सवय आहे जी लोकांच्या लक्षात येत नाही. ही वाईट सवय आहे असे त्यांना वाटत नाही. तर व्यक्तिमत्व विकासात याला वाईट सवयीत मोडण्यात आले आहे.


ओरडणे


ज्यांना ओरडण्याची, बोलण्याची सवय असते त्यांच्यासाठी लोकांच्या मनात नकारात्मकता निर्माण होते. हळू आणि नम्रपणे बोलणे हे चांगल्या गुणाचे लक्षण आहे. ज्यांना व्यक्तिमत्व घडवायचे आहे, त्यांनी आपली बोलण्याची पद्धत बरोबर ठेवावी.


जेवताना बोलतो


तुम्ही कसे खाता ते टेबल मॅनर्समध्ये येते. जेवताना अन्न सोडणे आणि या दरम्यान बोलण्याची सवय हे वाईट व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे. जर तुम्हाला चांगले व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर ही सवय त्वरित बदलण्याचा प्रयत्न करा.


सतत बोलण्याची सवय


काही लोकांना जास्त बोलण्याची सवय असते. बोलणे चांगले आहे, परंतु मजबूत व्यक्तिमत्व असलेल्या लोकांना अधिक ऐकणे आवडते. ते कमी बोलतात आणि त्यांचे मुद्दे पॉइंट टू पॉइंट ठेवतात. चांगल्या किंवा मजबूत व्यक्तिमत्त्वासाठी कमी बोलण्याची सवय लावा. ही सवय लावून घेतल्यास तुम्ही तुमच्या कामातही चांगले लक्ष देऊ शकता.


कम्युनिकेशन न करणे


काही वेळेस आपले जास्त बोलणे इतर लोकांना त्रायदायक ठरू शकते. त्यामुळे फार बडबड करणे टाळावे. जेवढे गरजचे आहे तेवढेच बोलावे.


धीर ठेवणे गरजेचे


अनेकदा आपल्याकडे पेशन्स नसल्याने आपण खूप गोष्टी गमावून बसतो. मात्र थोडे पेशन्स म्हणजेच धीर धरला तर खूप गोष्टी योग्य पद्धतीने मार्गी लागतात आणि आपली यशाक़े वाटचाल सुरू होते. मात्र त्यासाठी तुम्हाला शांत आणि संयमाने वागण्याची आवश्यकता असते. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Earn Money : सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या पैसे कमवा, वाचा सविस्तर, वाचा सविस्तर