Peas Health Benefits : थंडीचे (Winter Season) दिवस सुरु झाले आहेत. थंडीच्या दिवसांत बाजारात हिरवेगार वाटाणे (मटार) (Peas) देखली दिसायला सुरुवात होते. हिरवा वाटाणा हा लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला खायला आवडतो. शिवाय हिरव्या वाटाण्यापासून अनेक पदार्थही तयार करता येतात. जसे की, हिरव्या वाटाण्याची भाजी, कबाब, पराठे, सार, पुलाव भात अशा विविध पदार्थांत वाटाण्याचा समावेश केला जातो. मात्र, हा हिरवा वाटाणा चवीलाच नाही तर आरोग्यासाठीसुद्धा तितकाच फायदेशीर आहे. चवीसोबतच त्यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्मही असतात. हिरव्या वाटाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात. मटार खाण्याचे नेमके कोणते पायदे आहेत ते जाणून घ्या. 


जाणून घेऊया मटारचे फायदे :


1. चांगले कोलेस्ट्रॉल वाढवा :  मटारमध्ये नियासिन भरपूर प्रमाणात असते, ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.


2. वजन कमी करण्यात फायदेशीर : मटारच्या फायद्यांमध्ये वजन कमी करणे देखील समाविष्ट आहे. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. यामुळे पोट लवकर भरते आणि भूक लवकर लागत नाही. खाल्ल्याने लठ्ठपणापासून मुक्ती मिळते.


3. सांधेदुखीमध्ये फायदेशीर : मटारच्या फायद्यांमध्ये सांधेदुखीपासून मुक्ती मिळते कारण त्यात सेलेनियम नावाचा एक विशेष घटक आढळतो. तज्ज्ञांच्या मते, सेलेनियम संधिवातापासून मुक्ती मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते. सांधे संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वाटाणा खूप उपयुक्त मानला जातो.


4. दृष्टीसाठी फायदेशीर : मटारमध्ये ल्युटीन आणि झेक्साथिम नावाचे दोन विशेष घटक आढळतात. हे दोन्ही घटक डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जातात.डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी हिरवे वाटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत.


5. गरोदरपणात फायदेशीर : आयर्न कॅल्शियम आणि फॉलिक अॅसिडसोबतच मटारमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक आढळतात, जे गर्भवती महिलेसाठी अत्यंत आवश्यक मानले जातात, या कारणास्तव असे मानले जाते की गर्भवती महिलांनी मटारचे अधिकाधिक सेवन केले पाहिजे. सेवन


6. त्वचेची काळजी घ्या : मटारांना स्क्रीन फ्रेंडली म्हटले जाते कारण त्यात व्हिटॅमिन बी, सिक्स सी आणि फोलेट असते. हे पोषक दाह आणि मुक्त रॅडिकल्सचे नुकसान कमी करण्यास मदत करतात. मटारमध्ये फ्लेव्होनॉइड, कॅरोटीनॉइड आणि अल्फा कॅरोटीन असतात जे वृद्धत्वविरोधी म्हणून काम करतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : मनुक्याचे पाणी प्या आणि 'या' 4 आजारांपासून सुटका मिळवा; वाचा फायदे