Parenting Tips : आपल्या जीवनशैलीचा आणि सवयींचा आपल्या मुलांवर थेट परिणाम होतो. लहानपणी मुलांच्या अशा काही सवयी असतात ज्या बदलणं खूप कठीण असतं. काही सवयी मुलं बदलतातही पण काही मुलांच्या वाईट सवयी तशाच राहतात. लहानपणी मुलं अनेक नवीन गोष्टी शिकतात. आपल्या मुलांचे संगोपन करण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. मुलांमध्ये चांगल्या सवयी लावणे हे पालकांचे कर्तव्य आहे.
अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना लहानपणापासूनच काही चांगल्या सवयी शिकवल्या पाहिजेत. आज या ठिकाणी आपण अशाच काही चांगल्या गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता.
'या' सवयी मुलांना लहानपणापासूनच शिकवल्या पाहिजेत.
- मौखिक आरोग्य खूप महत्वाचे आहे. लहानपणापासूनच मुलांना ब्रश करण्याची सवय लावली पाहिजे. दिवसातून 2 वेळा ब्रश करणं मुलांच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. कारण मुलांच्या खाण्याच्या सवयींमुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होण्याचा धोका असतो. त्यांना रात्री ब्रश केल्यानंतर काहीही न खाण्यास शिकवा. रोज आंघोळ करणे ही चांगली सवय आहे. तुमच्या मुलाला रोज आंघोळ करण्याची आणि स्वच्छ राहण्याची सवय लावा.
- मुलांना रात्री वेळेवर झोपण्याची सवय लावा : खरंतर लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही निरोगी शरीरासाठी चांगली सवय आहे. यासाठी तुमच्या मुलाला रात्री शक्य तितक्या लवकर झोपण्याची सवय लावा. दिवसातून किमान 7-8 तासांची झोप मुलांसाठी गरजेची आहे.
- सकाळी नाश्ता करण्याची सवय लावा : मुलांच्या आरोग्यासाठी त्यांना योग्य वेळेत खाण्या-पिण्याची सवय लावणे देखील तितकंच गरजेचं आहे. सकाळी शाळेत जाण्यापूर्वी मुलांना योग्य आणि पौष्टिक नाश्ता द्या.
- मुलांना खरं बोलण्याची सवय लावा : लहानपासूनच जर मुलांना योग्य शिस्त आणि संस्कार दिले तर मोठेपणी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या सवयी महत्त्वाच्या ठरतात. मुलांना लहानपणापासूनच खोटं बोलण्यापासून जर तुम्ही रोखले तर मुले मोठी होऊन देखील त्यांना तेच वळण लागते. तसेच, मुलांना काय चांगलं आणि काय वाईट याची देखील जाणीव लहानपणापासूनच करून द्या. या सवयी तुमच्या मुलांना लावल्यास मुले योग्य मार्गावर लागतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :