Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...



Dholkichya Talavar : जाळ अन् धूर संगटच... कोकणची शान नेहा पाटील ठरली 'ढोलकीच्या तालावर'ची विजेती!


Dholkichya Talavar Winner Neha Patil : 'ढोलकीच्या तालावर' (Dholkichya Talavar) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला असून कोकणची शान नेहा पाटील (Neha Patil) या कार्यक्रमाची विजेती ठरली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Khumasdar Natyancha Goda Masala : "खुमासदार नात्यांचा गोडा मसाला" स्त्रीप्रधान मालिका येतेय प्रेक्षकांच्या भेटीला


Khumasdar Natyancha Goda Masala : 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' (Khumasdar Natyancha Goda Masala) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांत नवनवीन कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच आता स्त्रीप्रधान संस्कृतीचे गोडवे गाणारी एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' असे या मालिकेचे नाव आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sur Nava Dhyas Nava Show: स्पृहा जोशीच्या ऐवजी आता ‘ही’ अभिनेत्री करणार ‘सूर नवा ध्यास नवा’ चं सूत्रसंचालन; नेटकरी नाराज, म्हणाले...


Spruha Joshi: छोट्या पडद्यावरील सूर नवा ध्यास नवा (Sur Nava Dhyas Nava) या गाण्यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. आतापर्यंत या कार्यक्रमाचे पाच सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. आता लवकरच या कार्यक्रमाचा 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' हा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या गेल्या चार सीझनचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) करत आहे. पण आता या कार्यक्रमाच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन स्पृहा ऐवजी दुसरी अभिनेत्री करणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा



लागिरं झालं जी फेम अभिनेत्याचं "टॅलेंट"; पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले गोल्ड मेडल, म्हणाला, " उंचीमुळे शाळेत ..."


Mahesh Jadhav: छोट्या पडद्यावरील लागिरं झालं जी (Lagira Zala Ji) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या मालिकेतील शितल आणि अजिंक्य ही जोडी प्रेक्षकांना आवडली. या मालिकेत अभिनेता महेश जाधवनं (Mahesh Jadhav) "टॅलेंट" ही भूमिका साकारली होती. महेश हा सध्या त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. या पोस्टच्या माध्यमातून महेशनं त्याच्या दुसरी इनिंगची माहिती दिली आहे. महेशनं  2nd महाराष्ट्र राज्य पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2023- 24 या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Siddharth Chandekar: "आदल्या दिवशीचा चिकन-मटणाचा रस्सा, शिळ्या भाकरीचा कुस्करा"; सिद्धार्थच्या पोस्टनं वेधलं लक्ष


Siddharth Chandekar: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) हा विविध देशांमध्ये भटकंती करायला जात असतो. सिद्धार्थ हा त्याच्या फॉरेन ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. काही दिवसांपूर्वी  सिद्धार्थ  आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar)  हे फॉरेन ट्रीपला गेले होते.  सिद्धार्थनं कोणत्याही फॉरेन ट्रीपबाबत नाही तर चक्क चिकन-मटण,  शेव भाजी आणि शिळ्या भाकरीचा कुस्करा या पदार्थांबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा