Parenting Tips : आपली मुलगी (Daughter वयात आली की प्रत्येक पालकांना तिच्याबद्दल चिंता सतावू लागते. त्यात जर लेकीचे लग्न होणार असेल तर आणखी चार गोष्टी सांगितल्या जातात. मुलीला सासरी कोणत्याही प्रकारे अडचण होऊ नये, यामुळे लग्नाच्या वेळी आई-वडील मुलीला अनेक गोष्टी समजावून सांगतात आणि शिकवतात, पण काही महत्त्वाच्या गोष्टी तिला सांगितल्या नाहीत, याचा परिणाम मुलीला सासरच्या घरी एकटं वाटू शकते किंवा तिला तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण होऊ शकते. त्यामुळे मुलगी सासरी जाताना काही गोष्टी फक्त पालकच आपल्या मुलींना शिकवू शकतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत? ज्या तुम्ही तुमच्या मुलीला लग्नाआधी सांगाव्यात आणि शिकवल्या पाहिजेत. जाणून घ्या 


लग्नापूर्वी मुलीला या गोष्टी सांगा


 


सन्मान गमावू नये


अनेक वेळा नवीन कुटुंबात असे वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात, जे घरात आलेल्या नवीन सदस्याला कठोर शब्द बोलण्यापूर्वी विचार करत नाहीत. परंतु, तुमच्या मुलीला समजावून सांगा की काही किरकोळ समस्या उद्भवल्या तरीही तिने संयमाने वागले पाहिजे आणि तिचा आदर गमावू नये. मुलीने आपले मत व्यक्त केलेच पाहिजे. पण ती जशी आपल्या आई वडिलांना सांगायची तशीच रागाने पण आदराने या गोष्टी व्यक्त केल्या पाहिजे.


 


आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा


नवीन कुटुंब माहेरच्या कुटुंबापेक्षा अधिक समृद्ध असू शकते आणि पतीचा पगार इतका चांगला असू शकतो की तुमच्या मुलीला पुन्हा कधीही काम करावे लागणार नाही. पण, मुलीला समजावून सांगितले पाहिजे की, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहणे महत्त्वाचे आहे. जर तिने स्वतःच्या पैशाने तिच्या गरजा पूर्ण केल्या तर अशा अनेक समस्या आहेत, ज्यांना तिला कधीच तोंड द्यावे लागणार नाही, विशेषत: तिने जे परिधान केले आहे ते स्वतःचे खरेदी केलेले नाही, असा टोमणा तिला कधीच ऐकावा लागणार नाही.


 


नातेसंबंधांना वेळ देणे


मुलीला समजावून सांगितले पाहिजे की, एका रात्रीत नात्याला नाव देणे सोपे आहे, पण नाती रातोरात तयार होऊ शकत नाहीत. म्हणूनच एक-दोन दिवसांत मला माझ्या सासूबाई आवडत नाहीत किंवा मी माझ्या वहिनी आणि भावजयांवर रागावली आहे, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. मुलीला समजावून सांगा की, तिला तिच्या नातेसंबंधांच्या विकासासाठी आणि सुधारण्यासाठी वेळ द्यावा लागेल. जेणेकरुन ती सर्वांसोबत मिळू शकेल आणि स्वतःचे फुललेले घर स्थापित करू शकेल.


 


दुसऱ्याचा दृष्टीकोन समजून घेणे


बरेच लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवतात, परंतु इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्यास ते शिकू शकत नाहीत. पण, मुलीला इतरांचा दृष्टिकोन कसा समजून घ्यावा हे शिकवणे महत्त्वाचे आहे. जर ती सतत विचार करत असेल की तिच्याबरोबर काहीतरी चुकीचं घडतंय किंवा ती दोषी आहे, तर ती स्वतः कधीही आनंदी होणार नाही. मुलीला हे समजले पाहिजे की, कधीकधी तिची चूक असू शकते आणि हे समजून घेण्यासाठी, समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन काय आहे हे ओळखणे आवश्यक आहे.


 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Relationship Tips : रेशीमगाठ जुळत नाही? रिलेशनमध्ये तुमचा जोडीदार आनंदी नाही? हे संकेत वाचा आणि जाणून घ्या