Lucky Zodiac Sign On Holi 2024 : सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असू शकतात, पण ज्योतिषशास्त्रात त्यांचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहण आणि चंद्रग्रहण (Eclipse) या घटनांना फार महत्त्व आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला 25 मार्च 2024 रोजी या नव्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. एक , दोन नव्हे तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे. 


पंचांगानुसार 2024  मध्ये होळी 25  मार्च रोजी साजरा केला जाईल. चंद्रग्रहण आणि होळी एकाच दिवशी आहे. हे चंद्रग्रहण सकाळी 10  वाजून 23 मिनिटांनी सुरु होईल आणि दुपारी 3 वाजून 02 मिनिटांपर्यंत चालेल. या चंद्रग्रहणाचा सर्व 12 राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे. मात्र, यापैकी काही राशींसाठी हे चंद्रग्रहण जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरु शकते. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ. 


मेष   (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यासाठी हे चंद्रग्रहण फलदायी असणार आहे. कामाचा व्याप वाढेल.  तुम्हाला मोठे पदही मिळू शकते. या राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांनाही प्रगतीची संधी मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या लोकांची प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील.


वृषभ (Taurus)


वृषभ राशीसाठी चंद्रग्रहण शुभ असणाप आहे. तुमचे नशीब उजळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. नोकरीत महत्त्वाचे पद मिळू शकते. काही महत्त्वाची जबाबदारी यशस्वी पार पाडाल.  तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल. व्यापारी वर्गाशी संबंधित या राशीच्या लोकांना नफा कमावण्याची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. चंद्र देवाच्या कृपेने तुम्हाला मानसिक शांती लाभेल.


कन्या  (Virgo) 


कन्या राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले चंद्रग्रहण खूप चांगले असणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. या चंद्रग्रहणाचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत बढतीची शक्यता आहे. 


धनु (Sagittarius)


करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय केला तर व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक त्यांच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करू शकतात. तुमच्या आरोग्याच्या समस्या लवकरच दूर होतील. पगारात चांगली वाढ होईल. मित्र आणि पालकांसोबत तुमचे नाते अधिक घट्ट होतील. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Chandra Grahan: चंद्र ग्रहणामुळे यंदा होळीच्या रंगाचा होणार भंग; जाणून घ्या, वर्षातील पहिल्या ग्रहणाबाबतची इंतभूत माहिती