Papaya In Pregnancy : गर्भधारणा (Pregnancy) हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अत्यंत नाजूक काळ असतो. या दरम्यान प्रत्येक गरोदर महिलांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा वेळी तुमची एक छोटीशी चूक देखील गर्भपाताचे कारण ठरु शकते. गरोदरपणात काय खावं आणि काय खाऊ नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशातच काही फळे आहेत जी संतुलित आहाराचा भाग असतात, जसे की पपई. पण तुम्ही अनेकदा ऐकले असेल की गरोदर महिलांना पपई (Papaya) न खाण्याचा सल्ला दिला जातो. अननसाच्या बाबतीतही गर्भपाताचा संशय आहे. पण, गर्भवती महिलांना पपई न खाण्याचा सल्ला का दिला जातो? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.
गरोदर महिलांनी पपई का खाऊ नये?
गरोदरपणात पपई खाण्याबाबत अनेकांच्या मनात विविध प्रकारच्या शंका असतात, अनेक गैरसमज असतात. असं म्हटलं जातं की, पिकलेली पपई गरोदर महिलांसाठी चांगली असते तर, कच्ची पपई चांगली नसते.
पिकलेल्या पपईमध्ये अनेक घटक असतात...
1. बीटा कॅरोटीन
2. कॉलीन
3. फायबर
4. फोलेट
5. पोटॅशियम
6. जीवनसत्त्वे अ, ब आणि क
कच्च्या पपईतही अनेक गुणधर्म असतात, जसे की,
1. लेटेक्स
2. पपेन
गर्भवती महिलांनी कच्च्या पपईतील लेटेक टाळावे याचं कारण...
1. हे गर्भाशयाच्या आकुंचनला चालना देऊ शकते, ज्यामुळे तुमची प्रसुती लवकर होऊ शकते.
2. कच्च्या पपईमध्ये पपेन असते, ज्याला शरीर प्रोस्टॅग्लॅंडिन समजू शकते. हे गर्भाला आधार देणारा महत्त्वपूर्ण पडदा देखील कमकुवत करु शकते.
3. हे एक सामान्य अॅलर्जीन आहे, जे काही धोकादायक प्रतिक्रिया ट्रिगर करू शकते.
पिकलेली पपई गर्भवती महिलांसाठी पोषणाचा चांगला स्रोत असू शकते. पण कच्ची पपई खूप घातक ठरू शकते. काही गर्भवती स्त्रिया त्यांच्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान पिकलेली पपई खात राहतात. तर काही स्त्रिया बाळाला जन्म दिल्यानंतर पपई खाऊ लागतात. तुम्ही गर्भवती असाल किंवा गर्भवती होण्याची प्रक्रिया सुरु असेल तर कोणतीही वाईट परिस्थिती टाळण्यासाठी तुमच्या आहाराबद्दल तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त गरोदर महिला उपवास करत आहात? 'ही' काळजी घ्या