Paneer For Weight Loss : आजकाल वाढत्या वजनाची समस्या बहुतेकांना जाणवते. बदलती जीवनशैली, अपुरी झोप ही या मागील काही कारणे आहेत. जर तुम्हीही वजन कमी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्या आहारात पनीरचा समावेश नक्की करा. पनीरचा आहारात समावेश केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. शिवाय शरीराला पुरेशी ऊर्जाही मिळते. त्यामुळे तुमच्या आहारात पनीरचा वापर नक्की करा. पनीर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. पनीरमुळे शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर होऊन आणि स्नायू मजबूत होतात. पनीरच्या सेवनाने शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण होते. जाणून घ्या पनीरचा आहारात समावेश करण्याचे फायदे.
पनीर खाण्याचे फायदे
- पनीरमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
- पनीर खाल्ल्याने पोटाची चरबीही कमी होते. पनीर पचनास जड असल्याने ते खाल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही.
- पनीर खाल्ल्याने चयापचय वाढवण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होते.
- रोज पनीर खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊन हाडे आणि दात मजबूत होतात.
- पनीर ट्रान्स फॅट्स देखील काढून टाकते.
वजन कमी करण्यासाठी असा करा पनीरचा समावेश
- वजन कमी पनीर खात असाल तर गायीच्या दुधापासून बनवलेलं पनीर खाण्याचा प्रयत्न करा.
- गायीच्या दुधापासून बनवलेल्या सुमारे 100 ग्रॅम पनीरमध्ये 1.2 ग्रॅम कार्बोहायड्रेट असते. कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ तुमचे वजन लवकर कमी करण्यास मदत करतात.
- कच्चे पनीर खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. नाश्त्यात पनीर हलके भाजून किंवा कच्चेही खाऊ शकता.
- जर तुम्हाला कच्चे पनीर आवडत नसेल तर तुम्ही ते ग्रील करून किंवा बेक करून खाऊ शकता.
- तुम्ही नाश्त्यात पनीर बुर्जी आणि पनीर टिक्का यांचाही समावेश करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
- Health Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )