Onion Juice For Hair : अनेक जण केसांच्या तक्रारींनी त्रस्त असल्याचं पाहायला मिळतात. केस गळती, केसामधील कोंडा या समस्यां अनेकांना सतावत असतात. हल्ली अनेकांना टक्कल किंवा केस गळतीचा त्रास अनेकांना उद्भवत आहे. तर अनेकांना लांबसडक केस हवे असतात. कांद्याचा रस आणि अन्य पोषक तत्व या समस्येवर जालीम उपाय ठरू शकतो. पण कोणत्याही वस्तूच्या वापराबाबत योग्य माहिती आवश्यक आहे.
कांद्याचा रस लांबसडक केसांसाठी कसा उपयुक्त ठरू शकतो, त्याबाबतच्या काही टिप्स -
1) कांद्याचा रस आणि खोबरेल तेल
कांद्याचा रस आणि खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावण्याचा फायदा होतो. कांद्याच्या रसाप्रमाणेच खोबरेल तेलाच्या वापराने केस लवकर वाढू शकतात. कोमट खोबरेल तेलात कांद्याचा रस मिसळून तो केसांच्या मुळांना लावल्यास, केसांना चमक येईल.
2) कांद्याचा रस आणि जैतून (ऑलिव) तेल
कांद्याचा रस आणि जैतून (ऑलिव) तेल कांद्याच्या रसात जैतून तेल मिसळून ते केसांच्या मुळाला लावल्यास त्याची चांगली वाढ होते. हे मिश्रण योग्यप्रकारे मिसळून ते केसांना लावल्यास काही दिवसातच फरक जाणवू शकतो.
3) कांद्याचा रस आणि बियर
3) कांद्याचा रस आणि बियरच्या मिश्रणाचेही भन्नाट फायदे आहेत. सर्वप्रथम कांद्याच्या रसाने डोक्यावरील त्वचेला हलका मसाज करा. त्यानंतर चांगल्या बियर शॅम्पूने केस धुवा. कांद्याचा रस आणि बियर मिसळून ते डोक्याला लावू शकता. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर महत्वाच्या बातम्या-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
4) केवळ कांद्याचा रस वरील काहीही शक्य नसल्यास, केवळ कांद्याचा रस काढून, त्याने केसांना मसाज करा. काही वेळ मसाज केल्यानंत, तो रस डोक्यावर सुकू द्या. त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवा.