Omicron Variant Alert : संपूर्ण जगभरात कोरोनाने (Coronavirus) हातपाय पसरले असताना आता नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनने दहशत निर्माण केली आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या रूग्णांच्या संख्येने चिंता जास्त वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज कोरोनाचे ३ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत. जरी बरेच लोक यातून बरे झाले असले, तरी मात्र शरीरात अशक्तपणा कायम राहतो. यासाठी तुम्हाला काही काळजी घ्यावी लागेल. ती कशी ते जाणून घ्या. 


ओमायक्रॉन व्हेरियंटमधून (Omicron Variant) बरे झाल्यानंतरही रुग्णांमध्ये अशक्तपणासारखी लक्षणे पाच ते आठ दिवस दिसतात. त्यामुळे कोविड-19 मधून बरे झाल्यानंतरही तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या पदार्थाचे सेवन करू नये. हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


बाहेरचे अन्न खाऊ नका
कोरोनातून बरे झाल्यानंतरही रुग्णांनी काही काळ बाहेरचे अन्न खाणे टाळावे. अशा वेळी फक्त घरी शिजवलेले अन्न खावे. कारण बाहेरील अन्नामध्ये भेसळयुक्त पदार्थ असू शकतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे बाहेरचे अन्न खाणे टाळावे.


फ्रोजन फुड खाणे टाळा 
कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांनी काही काळ फ्रोझन पिझ्झा, कुकीज, केक, चॉकलेट यांसारख्या गोष्टींचे सेवन करू नये. कारण काही कंपन्या त्यात साखर आणि मीठ, मसाले वापरतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.


पॅकेट केलेले अन्न
कोविड -19 मधून बरे झाल्यानंतर, भेसळ केलेले आणि पॅकेज केलेले अन्न खाऊ नये. यामध्ये यांत्रिक आणि रासायनिक प्रक्रिया केली जाते. जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha