Coronavirus NeoCoV Variant: आधी कोरोना (Corona Virus) आला, मग डेल्टा आणि ओमायक्रॉन, या विषाणूंशी जग दोन हात करतच होतं की, आता आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेत आढळलेला NeoCov व्हेरियंट सर्वात वेगाने पसरू शकतो आणि ते खूप घातक देखील सिद्ध होऊ शकते.


उच्च मृत्यू आणि संसर्ग दर


वुहानमधील शास्त्रज्ञांनी 'NeoCoV' या नवीन प्रकारच्या कोरोना व्हायरसबद्दल चेतावणी दिली आहे. यात संभाव्य मृत्यू आणि संसर्गाचे प्रमाण जास्त होऊ शकते, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. चिनी संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये पसरलेला 'NeoCoV' हा कोरोना विषाणू भविष्यात मानवांसाठी धोकादायक ठरू शकतो.


'NeoCoV' बद्दलच्या काही खास गोष्टी माहित असणे आवश्यक आहे:



  • कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत, ज्यात सामान्य सर्दीपासून ते Severe Acute Respiratory Syndrome (SARS) पर्यंतचे आजार होऊ शकतात.

  • स्पुतनिकच्या अहवालानुसार, 'NeoCoV' प्रथम दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये सापडला आणि नंतर तो प्राण्यांमध्ये पसरला.

  • आतापर्यंत एकाही माणसाला याची लागण झालेली आढळली नाही, तरीही शास्त्रज्ञ या परिस्थितीसाठी सज्ज आहेत.

  • वुहानस्थित शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, उत्परिवर्तनामुळे विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो.

  • जर, व्हायरसने ते एक उत्परिवर्तन प्राप्त केले, तर NeoCoV हा विषाणू मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असेल आणि धोका निर्माण करेल, कारण तो ACE2 रिसेप्टरला कोरोना व्हायरसपेक्षा वेगळ्या पद्धतीने बांधतो. रिसेप्टर-बाइंडिंग डोमेन हा विषाणूचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो शरीराच्या रिसेप्टर्समध्ये पेशींमध्ये प्रवेश करू शकतो आणि संक्रमणास कारणीभूत ठरतो.

  • नवीन व्हायरस NeoCoV कोरोना व्हायरस सारखा नाही. अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, यामुळे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) होऊ शकतो. हा एक विषाणूजन्य आजार असून, सौदी अरेबियामध्ये 2012मध्ये पहिल्यांदा आढळला होता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha