Upvasacha Dhokla Recipe : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची सर्वजण वाट पाहत आहेत. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रोत्सवात अनेक मंडळी उपवास करतात. या दिवसांत हलका-फुलका आहार घेणं गरजेचं आहे. तर आज जाणून घ्या उपवासाचा खमंग ढोकळा (Upvasacha Dhokla Recipe) बनवण्याची रेसिपी...


'उपवासाचा खमंग ढोकळा' बनवण्यासाठी लागणारे साहित्य - 



  • वरीचे पीठ - 1 कप

  • साबुदाणा - 1.4 कप पूड

  • दही - 1.2 कप

  • पाणी - 1.2 कप

  • बेकिंग सोडा - 1.2 चमचा

  • सैंधव मीठ - 1 चमचा

  • जिरे - 1 चमचा

  • लिंबाचा रस - 1.2 चमचा

  • कोथिंबीरीची पाने - 1 चमचा

  • हिरव्या मिरच्या - आवश्यकतेनुसार


'उपवासाचा खमंग ढोकळा' बनवण्याची कृती - 


- एका वाटीत 1 कप वरीच्या तांदळाचे पाठी, साबुदाणा पावडर, दही, चवीनुसार सैंधव मीठ, आणि आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या चिरुन त्यात पाणी घालून ते छान मिक्स करा. 


- तयार झालेलं मिश्रण 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवा. 


- एका प्लेटला तेल लावून तयार झालेलं मिश्रण त्यामध्ये ओता. 


- मिश्रण सर्वत्र एकसमान पसरुन घ्या. 


- आता एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी उकळवून घ्या.


- आता त्या पॅनवर ढोकळ्याचं मिश्रण ओतलेली डिश ठेवा आणि पॅनवर झाकण ठेवा.


- हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे वाफेवर शिजत ठेवा.


- त्याचवेळी बाजूला दुसरा एक पॅन घेऊन त्यामध्ये तेल गरम करा.


- गरम तेलामध्ये जीरे आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून चांगलं परतून घ्या.


- ढोकळ्याला आपल्या आवडीच्या आकारात कट करा आणि हिरव्या मिरच्या आणि जिऱ्याच्या फोडणीने गार्निशिंग करा.


- तयार झालेल्या खमंग ढोकळ्याचा चटणीसोबत आस्वाद घ्या. 



उपवास करताना काय काळजी घ्यावी?


- नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय प्रवास करणे टाळावे. 


- आजारी असल्यास उपवास करणे टाळावे. 


- गरोदर महिलेने वैद्यकीय सल्ला घेऊन उपवासाबाबतचा निर्णय घ्यावा. 


- उपवासादरम्यान फळे आणि दुधाचं सेवन करावं.
 
- आपल्या क्षमतेचा विचार करुन उपवास करण्याचा निर्णय घ्यावा.


- उपवास करताना योग्य आहार घेणं गरजेचं आहे.  


संबंधित बातम्या


Navratri Recipe : उपवासाला खिचडी खाऊन कंटाळलात? 'हा' डोसा एकदा ट्राय कराच, पाहा सोपी रेसिपी


Navratri Recipe : खुसखुशीत साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...